📰 ताज्या घडामोडी

परतुरात शूक्रवारी श्रीराम मंदिर निर्माण समर्पण महाअभियान भव्य शोभायात्रेचे आयोजन , दि.१५ जानेवारी पासून तालुक्यातील १११ गावातील ४५ हजार कुटुंबांपर्यंत ११०० कार्यकर्ते पोहचणार

च
Shamsundar chittoda
13 जानेवारी 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

- समस्त भारत वासीयांचे आदर्शवत महापुरुष श्रीराम यांचे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहावे, असे भारतातील प्रत्येकाला वाटत होते, ते श्रीरामाच्या मंदिर निर्माणाचे ध्येय आता लवकरच पूर्ण होणार आहे.यानिमित्ताने श्रीरामाच्या मंदिर निर्माणात देशभरातील प्रत्येक कुटुंबातील, प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागावा म्हणून संबंध देशभरात दि.१५ जानेवारी पासून या महाअभियानाची सुरुवात होत आहे.या अनुषंगाने परतूर शहरात शूक्रवार.१५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रेल्वे गेटपासून लेझीम पथकासह व वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही शोभायात्रा पोलीस स्टेशन मार्गे दसमले चौक मार्गे नारायण दादा पवार चौकात जाणार आहे.या यात्रेचा समारोप नारायण दादा पवार चौकात होणार आहे.गुरुवार दि.१५ जानेवारी पासून पुढील एक महिना दि.१५ फेब्रुवारीपर्यंत या अभियानाच्या निमित्ताने परतूर शहरातील व तालुक्यातील ११०० कार्यकर्ते ३ उपखंड,११ मंडलातून १११ गावातील ४५ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मंदिर निर्माणाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.शहरात गुरुवार दि.१५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य शोभायात्रेत समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन परतूर तालुका श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→12 जानेवारी 2021
खांडवीवाडी येथील जि.प.शाळेत जंयती साजरी

खांडवीवाडी येथील जि.प.शाळेत जंयती साजरी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात