📰 ताज्या घडामोडी

न्युजपेपर्स ऑफ इंडियाच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने दर्पणदिनानिमित्त मान्यवर पत्रकारांसह गुणवंत कर्मचार्‍यांचा सत्कार' मोठ्या संख्येने उपस्थित रहा -विकासकुमार बागडी

Shamsundar chittoda
4 जानेवारी 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना : (प्रतीनीधी)

६ जानेवारी अर्थात् पत्रसृष्टीचे पितामह आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिन ! त्याच अनुषंगाने असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडीयम न्युजपेपर्स ऑफ इंडियाच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास संंबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन असोसिएशनचे जालना जिल्हा अध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे. या संदर्भातील प्रसिध्दी पत्रकात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, बुधवार,दि.६ जानेवारी २०२० रोजी आयएमए हॉल, भोकरदन नाका, जालना येथे सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमास सुप्रसिध्द उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री घनशामसेठ गोयल, कैलासजी लोया, सतीषजी अग्रवाल, सुभाषजी देविदान,विनीत साहणी, विनयजी कोठारी, डॉ.ओमजी अग्रवाल, रवीसेठ अग्रवाल, तुलजेसभैय्या चौधरी, डुंगरसिंगजी पुरोहित,चेतनभाऊ कांबळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत! याच कार्यक्रमात पत्रकारितेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, पत्रकारितेसाठी समर्पित भावनेने वृत्तपत्र चालवले, वृत्तपत्र चालवण्याची मोठी कसरत केली आणि करत आहेत असे पत्रकार सर्वश्री अंकुशरावजी देशमुख, भारतजी धपाटे, विजयजी सकलेचा, संजयजी भरतिया, बद्रीनाथजी टेकाळे, अविनाशजी कव्हळे,रविजी बांगड, ओमप्रकाशजी शिंदे, अनुपजी उर्फ गोपाल राठी, धमेंद्रजी जांगडे, महेशजी जोशी, पारसजी नंद, अमितजी आनंद आणि लियाकतअली खान या मान्यवर पत्रकार मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. तर ज्या जुन्या- जाणत्या मंडळींनी पत्रकारितेला उभारी देण्याचे कार्य केले. ज्यावेळी संगणक प्रणालीही अस्तित्वात नव्हती आणि भ्रमणध्वनीची सुविधा देखील फारकाही व्यवस्थीत नव्हती, अशा काळात पत्रकारितेत स्वत:ला वाहून घेत अत्यंत चांगल्या पध्दतीने या क्षेत्रात नावलौकिक मिळवला ते सर्वश्री सतीशजी सुदामे, शशिकांतजी पटवारी, ललित पटवारी, लक्ष्मीनारायण गौड, जुगलकिशोर शर्मा, रमेश पाटील, उदयजी पटवारी, अलिमभाई, मनोहर बुजाडे, रमण गायकवाड, दिगंबर शिंदे, अबु हसन, रतनलाल कुरिल, आनंदकुमार जैस्वाल, संतोष भालेराव, राजेंद्र तिरुखे यांचा मरणोत्तर गौरव करुन श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्रात ज्यांनी पडद्यामागची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. आपल्या कार्यकुशलतेची छाप दाखवली मात्र ज्यांचा आजपर्यंत कुणीही आदर- सत्कार केल्याचे ऐकिवात आलेले नाही. ज्यांच्या कामाचे श्रेय दुसर्‍यांना मिळाले किंवा ते दुसर्‍यांनीच घेतले, अशा गुणीवंत कर्मचार्‍यांचाही या कार्यक्रमात भेट वस्तू देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास आपण आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडीयम न्युजपेपर्स ऑफ इंडियाच्या जालना जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात