📰 ताज्या घडामोडी

युवा मोर्चाची मराठवाड्यामध्ये मोठी ताकद पदवीधर मतदारसंघात भाजपा चा उमेदवार निवडून अणन्या साठी पूर्ण शक्ती लावणार- प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Shamsundar chittoda
2 नोव्हेंबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष ,आणि शेवटी मी, ही विचारधारा घेऊन चालणारा भारतीय जनता पार्टी हा भारतीय राष्ट्रीयत्व मानणारा पक्ष असून येत्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी युवा मोर्चा संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले.

पदवीधर मतदार संघाच्या नांदेड ग्रामीणच्या अर्धापूर जि नांदेड येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते

या वेळी व्यासपीठावर खा प्रताप पाटील चिखलीकर,भा ज पा विभागीय संघटन मंत्री संजयजी कोंडगे, भा ज पा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख ,ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव इंगोले, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेभाऊ देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती .

पुढे बोलताना महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की दोन, तीन निवडणुका अगोदर मराठवाडा पदवीधर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला होता जयसिंगराव काका गायकवाड ,श्रीकांतजी जोशी आदी मान्यवरांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा पुन्हा एकदा या मतदारसंघाचा पदवीधर मतदार संघाचा आमदार भारतीय जनता पार्टी चा केल्या शिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले .

मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीची व युवा मोर्चा ची पाळेमुळे खोलवर रुजलेली असून आपण सर्वजण सर्व शक्ती एकवटून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले .

पुढे ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला, घराणे खानदान न पाहता जाती-धर्म च्या पलीकडे जाऊन संधी दिली जाते त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाला संधीसाठी काम करण्याची ही वेळ असून आपल्या कामाच्या माध्यमातून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात