📰 ताज्या घडामोडी

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 1 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी, विभागात आचारसंहिता लागू

च
Shamsundar chittoda
3 नोव्हेंबर 2020•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

औरंगाबाद, दि. 2 (विमाका) - मा. भारत निवडणूक आयोगाने 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी मतदान हे मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी तर मतमोजणी गुरुवार, दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून औरंगाबाद विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत श्री. केंद्रेकर यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देंशन पत्र भरण्याची अंतिम तारीख राहील. दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल. दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत मतदान होईल. मतमोजणी ही दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होईल. दि. 7 डिसेंबर 2020 रोजी निवडणुक प्रक्रीया संपेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाणार आहे. मतदारांसह निवडणूक प्रक्रीयेतील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य राहणार असून मतदान केद्रांवर सुरक्षित अंतर राखणे, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता असणार आहे. प्रत्येक जिल्हयासाठी नोडल आरोग्य अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. अशी माहिती श्री. केंद्रेकर यांनी दिली.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 नोव्हेंबर 2020
युवा मोर्चाची मराठवाड्यामध्ये मोठी ताकद             पदवीधर मतदारसंघात भाजपा चा उमेदवार निवडून  अणन्या साठी पूर्ण शक्ती लावणार- प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

युवा मोर्चाची मराठवाड्यामध्ये मोठी ताकद पदवीधर मतदारसंघात भाजपा चा उमेदवार निवडून अणन्या साठी पूर्ण शक्ती लावणार- प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात