📰 ताज्या घडामोडी

मतदारसंघाचा कायापालट करणे ही आमची जबाबदारी,मतदार संघातील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले - प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Shamsundar chittoda
27 ऑक्टोबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (प्रतिनिधी) गेल्या पाच सहा वर्षांमध्ये परतूर मतदार संघाचा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास झाला असल्याचे प्रतिपादन भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी केले

ते परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव ,कोकाटे हदगाव तांडा, व हातडी तालुका परतुर येथे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते

पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की आपल्यावर भारतीय जनता युवा मोर्चा ने राज्याची जिम्मेदारी टाकली असून आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विविध माध्यमातून जनतेची सेवा करणार असल्याचे ते म्हणाले.

मतदारसंघातील जनतेने आपल्याला भरभरून दिले असून आपण मतदार संघाचे पांग फेडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास त्यांनी या वेळी बोलून दाखवला

विकासाच्या कामांमध्ये आणि समाजाच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आपण ठाम असल्याचे सांगत येथील युवा व सर्व स्तरातील नागरिक माझे कुटुंब असून माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेण्याचे काम या पुढे ही आपण सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले

मतदारसंघातील जनतेचे आपल्यावर ऋण असून ते ऋण फेडण्यासाठी आपण कधी मागे हटणार नसल्याचे ते म्हणाले

मी समाजकारणाच्या माध्यमातून 2001 साली राजकारणात प्रवेश केला तेव्हा पासून आपण दिलेल्या भरभरून प्रेमा मुळे मी आज इथपर्यंत पोहचलो असल्याचे ते म्हणाले

या वेळी कोकाटे हदगाव येथे आरो फिल्टर चे लोकार्पण तसेच कोकाटे हदगाव ते लिंबी रस्त्याचे उद्घाटन त्याचबरोबर देवीच्या मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले तर कोकाटे हदगाव तांडा येथे सेवालाल महाराज सामाजिक सभागृहाचे बांधकामा चे भूमिपूजन यावेळी करण्यात आले तर हातडी तालुका परतुर येथे आरो फिल्टर चे लोकार्पण यावेळी राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले, जिल्हा परिषद सदस्य सुदामराव प्रधान, कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी चे सभापती सिद्धेश्वर सोळंके, पंचायत समिती सदस्य प्रदीप ढवळे ,पंचायत समिती सदस्य शिवाजी पाईकराव , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, गजानन लोणीकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपतराव टकले तालुका सरचिटणीस रवी सोळंके, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अविनाश राठोड अमोल पवार, ज्ञानेश्वर सोळंके अण्णासाहेब ढवळे, बालासाहेब पोटे भीमराव राठोड, श्री गांजाळे ,गंगाधर ढवळे, रमेशराव आढाव ,ओम प्रकाश बोरकर, दत्ता फटिंग, मदनराव गोरे, मुंजा झरेकर, गंगाधर बोरकर ,प्रल्हाद बोरकर, दादासाहेब बोरकर ,रमेश राव बोरकर ,गणेश बोरकर, तुकाराम बोरकर, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात