📰 ताज्या घडामोडी

परतूरकरांसाठी सुवर्णसंधी : कोठाळकर हॉस्पिटलतर्फे २१ जून रोजी भव्य मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

Shamsundar chittoda
19 जून 2026⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळाव्यात या उद्देशाने, येथील प्रसिद्ध 'कोठाळकर हॉस्पिटल क्रिटीकेअर व दातांचा दवाखाना' (आय.सी.यू. / ट्रॉमा व इमर्जन्सी सेंटर) च्या वतीने भव्य 'मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि २१ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोठाळकर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये जालना आणि परतूर येथील विविध रोगांवरील तज्ज्ञ व नामांकित डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विष्णू एच. भुते, आर. व्ही. मेडीकेअर, जालना), मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. प्रल्हाद धारूरकर, न्यूरे सर्जरी, परिनिका न्युरोकेअर, जालना), अस्थिरोग व फ्रॅक्चर तज्ज्ञ डॉ. अरविंद म्हस्के, विघ्नहर्ता हॉस्पिटल, जालना), किडनी विकार तज्ज्ञ डॉ. संदीप प. देशमुख, आशुतोष हॉस्पिटल, जालना), डॉ. सतिश चव्हाण, चव्हाण हॉस्पिटल, परतूर), डॉ. अर्जुन अ. साबळे आणि दंत व मुख रोग तज्ज्ञ डॉ. शितल अ. साबळे हे आपली तज्ज्ञ सेवा देणार आहेत.

या शिबिरादरम्यान रुग्णांची मोफत रक्तदाब, शुगर आणि ई.सी.जी. तपासणी केली जाणार असून विविध आजारांवर उपचार व निदान करण्यात येईल. यामध्ये २४ तास ऑक्सिजन सुविधा, सुसज्ज आय.सी.यू. विभाग, आपत्कालीन विभागात हृदयविकार निदान व उपचार तसेच सर्पदंश व विंचूदंश यांसारख्या विषबाधेवर तातडीचे उपचार केले जातील. यासोबतच पॅरालिसिस व फिट्स येणे यांसारखे मेंदूविकार, दमा, टी.बी. व छातीत पाणी होणे यांसारखे फुफ्फुसाचे आजार, साथीचे रोग, पोटात पाणी होणे यांसह पोटाचे विकार आणि किडनीच्या आजारांवर विशेष उपचार व मार्गदर्शन केले जाईल. तसेच हॉस्पिटलमध्ये २४ तास लॅबोरेटरी आणि औषधींची सोय देखील उपलब्ध असेल.

या शिबिरात दातांच्या आजारांवरही अत्याधुनिक दंत उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये डिजिटल एक्स-रे मशीन, अत्याधुनिक पद्धतीचे रोटरी, सिस्टीम रूट कॅनाल, अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दात साफ करणे, दात व हिरड्यांचे सर्व उपचार आणि जबड्याच्या सर्व शस्त्रक्रियांची उत्तम सुविधा दिली जाईल.

हे शिबिर 'कोठाळकर हॉस्पिटल क्रिटीकेअर व दातांचा दवाखाना, परतूर-वाटूर रोड, रेल्वे स्टेशन जवळ, बालाजी नगर, परतूर जि. जालना' येथे संपन्न होणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी नागरिकांनी ८४८२९४७५९४ किंवा ९६३७२१३९६९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक डॉ. अर्जुन साबळे व डॉ. शितल साबळे यांनी केले आहे. आरोग्य सुविधेपासून वंचित असलेल्या गरजू रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात