📰 ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निवडपत्राचे मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण!

Shamsundar chittoda
15 फेब्रुवारी 2026⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' चे जालना जिल्ह्यातील पुरस्कार्थीना आज मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करून निवडपत्र प्रदान करण्यात आले.

सर्वप्रथम दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पुजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्यसमन्वयक भगवान जायभाये यांनी केले.बदनापूरचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय क्षीरसागर, घनसावंगी चे गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, समता शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण जोशी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जालना जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र शिक्षक पॅनल आणि पुरस्कार्थी श्रीम. साधनाताई गिऱ्हे, विकास पोथरे, श्रीनिवास सुदेवाड, निलेश सोमवंशी, भाऊसाहेब खाडे, शामराव टेकाळे, रणधीर पाटील, भाऊसाहेब कोलते, सिद्धार्थ म्हस्के, श्रीम. स्नेहल पवार, श्रीम दीपाली जोंधळे, श्रीम फरहत तांबोळी, निर्वती भालेकर, मनोहर विरकर, आवेज पठाण या शिक्षकांचे अभिनंदन तसेच कौतुक केले.

हा पुरस्कार जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे अध्यक्षीय भाषणात जालना शिक्षक पतसंस्था चेअरमन जगत घुगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालना शिक्षक पतसंस्था सचिव संतोष देशपांडे तर आभारप्रदर्शन जिल्हा समन्वयक चंद्रशेखर ठाकूर यांनी केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जालना शिक्षक पतसंस्था संचालक जगन्नाथ शिंदे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष सुनील साबळे,महाराष्ट्र शिक्षक पॅनल प्रतिनिधी मन्मथ होनराव आदींनी परिश्रम घेतले.

या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि पालक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात