📰 ताज्या घडामोडी

परतूर येथे बी.रघुनाथ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

Shamsundar chittoda
4 नोव्हेंबर 2025⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर प्रतीनीधी संतोष शर्मा

येथील आयुर्वेद प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा तिसरा बी.रघुनाथ पुरस्कार सुप्रसिद्ध कथाकार राम निकम यांना जाहीर झाला असून बुधवारी दि. 5 नाव्हे.2025 रोजी परतूर शहरात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते तिसरा बी.रघुनाथ पुरस्कार राम निकम यांना प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची उपस्थिती असणार आहे. सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा.छबुराब भांडवलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य असणारे डॉ. पृथ्वीराज तौर यांना वाड्मयीन योगदानासाठी रशियातील मॉस्को मध्ये वर्ल्ड्स रायटर्स असोशियन तर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. पृथ्वीराज तौर यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याला जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयुर्वेद प्रतिष्ठानचे डॉ.दीपक दिरंगे, डॉ.भानुदास कदम यांच्यासह आविष्कार साहित्य मंडळ,अभिरुची साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात