📰 ताज्या घडामोडी

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

Shamsundar chittoda
6 सप्टेंबर 2024⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

दिनांक 5 सप्टेंबर 2024 वार गुरुवार रोजी परतूर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व श्री चक्रधर स्वामी यांची जयंतीचे औचित्य साधून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य जयकुमार तीमोथी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक ,व शिपाई या भूमिका निभावून आजच्या दिनी शाळेचे कामकाज चालवले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेचे संचालक सुबोध चव्हाण यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ, ग्रीटिंग कार्ड व भेट वस्तू देण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना शाळेचे संचालक श्री सुबोध चव्हाण यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्प व भेटवस्तू देऊन त्यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खेळाचे आयोजन केले होते शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची सहशिक्षक श्री गजानन कुकडे यांनी केले. यावेळी शाळेचे संचालक संतोष चव्हाण, सुबोध चव्हाण, शाळेच्या संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण, प्राचार्य जयकुमार तीमोथी, भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रदीप चव्हाण, राजेश कार्लेकर, सहशिक्षक गजानन कुकडे, रमेश कदम, शाहीर मुजावर, प्रदीप साळवे, विजय भापकर वंदना ककरीये, स्वाती काळे,मीनाक्षी भाग्यवंत, त्रिवेणी गिरी, निकिता कदम, शिबा काजी, श्वेता पाठक, अश्विनी डोंबाळे, मनीषा लहाने, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात