📰 ताज्या घडामोडी

जालना स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाई;टिपकराज बार मधील चोरी प्रकरणी गुन्हेगार जेरबंद

Shamsundar chittoda
25 ऑगस्ट 2024⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना

जालना शहरातील स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाई जालना जिल्ह्यातील धारकल्याण येथील दीपक राज बारमध्ये चोरी करणारा परभणी येथील सराईत आरोपीस जेरबंद करून 60,262/- किमतीचा मुद्देमाल केला जप्त....

सिंदखेडराजा ते जालना रोडवरील धारकल्याण येथील हॉटेल दीपक राज बार मध्ये दिनांक 16 अगस्त रोजी विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या रात्री दोन वाजता सुमारास चोरी गेल्याची घटना घडली, हॉटेल बारचे मालक यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे चोरीची फिर्याद दिली कलम 305 (A),334(1) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता

सदरील गुन्ह्याचा तपासा बाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरच्या गुन्ह्या बाबात सूचना देवून मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने दिनांक 24 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व आमलदार यांनी सदरील गुन्ह्या बाबत आरोपी शेरूसिंग सोजितसिंग भोंड वय 22 वर्ष याला परभणी येथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून रुपये 60,265/- किमतीच्या विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा यांनी कळवीले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाली, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे,सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ, सोबत पोलीस अंमलदार कांबळे ,कृष्णा तंगे, रामप्रसाद पव्हरे, सुधीर वाघमारे, कैलास खाडे, भाऊराव गायके, लक्ष्मीकांत आडेप, जगदीश बावने, जैवाल, बाविस्कर, इरशाद पटेल, चिचोले, मुळे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली..

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात