📰 ताज्या घडामोडी

साप्ताहिक वृत्तपत्रांच्या विविध मागण्यांसाठी 4 जुलै रोजी निवेदन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे-विकासकुमार बागडी

Shamsundar chittoda
2 जुलै 2024⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना- प्रतीनिधी समाधान खरात

मागील अनेक वर्षांपासून या स्थानिक वर्तमानपत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे साप्ताहिकांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने राज्यभरात दि. 04 जुलै रोजी निवेदन देण्यात येणार असून यावेळी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

जालना जिल्ह्यातही 04 जुलै रोजी व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणेच साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे, साप्ताहिक वृत्तपत्राची द्वीवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा, साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी, अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी, रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना शंभर टक्के सवलत सुरू करावी, पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफतमध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी, आर एन आय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. जिल्ह्यातील सर्वसाधारण पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावे व कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, इच्छूक व गरजवंत पत्रकारांना हमखास शस्त्र परवाना देण्यात यावा, सर्वसाधारण पत्रकारांच्या पाल्यांना प्राथमिक आणि उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे, जालना जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढली असून पत्रकारांच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेण्यात यावी, ज्या ज्येष्ट पत्रकारांना तात्काळ पेन्शन सुरु करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. तरी यावेळी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी राहून आपली समस्या मांडावी, असे आवाहन व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात