📰 ताज्या घडामोडी

शिक्षण महर्षी बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार वाबळेवाडीच्या वारे गुरुजींना जाहीर, ८ मार्च रोजी वितरण

Shamsundar chittoda
7 मार्च 2024⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयाच्या वतीने दिला जाणारा शिक्षण महर्षी स्व.बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार यंदा जि.प.आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडीचे तत्कालीन मुख्याध्यापक तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

स्व .बाबासाहेब भाऊ आकात

दत्तात्रय वारे गुरुजी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा गावाचा कायापालट करून गावाला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना पहिला पुरस्कार देण्यात आला आहे. दुसऱ्या पुरस्कारासाठी वारे गुरुजींची निवड पुरस्कार निवड समितीने केली आहे.

येत्या ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता परतूर येथील स्व.बाबासाहेब आकात सभागृह, लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते सदरील पुरस्कार वारे गुरुजींना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात यांची उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे, पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. कुणाल आकात यांची उपस्थिती असणार आहे.

वाबळेवाडी शाळेला आतंरराष्ट्रीय शाळा बनविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी घेतलेली मेहनत, लोकांचा सहभाग या बाबत वारे गुरुजी आपले अनुभव कथन या कार्यक्रमात करणार आहेत.

याच कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकलचे वितरण करण्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

परतूर आणि परिसरातील नागरिकांनी पुरस्कार वितरण सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्यवस्थापन परिषद सदस्य, प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी केले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात