📰 ताज्या घडामोडी

जे जाळतय त्याला आधी जळावं लागतं - ह भ प समाधान महाराज शर्मा.

Shamsundar chittoda
4 फेब्रुवारी 2024⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर शहरात रंगली शिव कथा.

लाखो भाविकांनी कथामंडप ओसंडला.

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

परतूर शहरात माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित शिव कथा सांगताना समाधान महाराज शर्मा यांच्या ओजस्वी वाणीतून दुसऱ्या दिवशी

जे जाळतय त्याला आधी जळावा लागतं वातीला तेल जाळतं पण त्या तेलाला आधी जळावं लागतं त्यामुळे दुसऱ्याला जाळणं बंद करा असा उपदेश ह भ. प. समाधान महाराज शर्मा यांनी आज कथेच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित भाविकांना दिला.

परतूर शहरात माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांच्या परिवाराच्या वतीने संगीतमय भव्य शिवकथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिव कथेचा विस्तार करताना दुसऱ्या दिवशी समाधान महाराज शर्मा म्हणाले की, दुसऱ्याला जाणाऱ्याला आधी स्वतःला जळाव लागत. यावेळी त्यांनी दिव्यातील तेल व वात यांचे उदाहरण देऊन जळणे व जाळणे याचे मार्मिक उदाहरण दिलं. गाय पवित्र आहे. तिचे सर्वच उपयोगी पडते दूध, शेन, गोमूत्र मात्र काही लोक कुत्र्याला जीव लावतात. परमार्थातील भामटेपणा बंद झाला पाहिजे, परमार्थ थोडाच करा, पण मनातून करा. गंध कपाळावर थोडाच लावा, पण चारित्र्याचा सुगंध सर्वत्र दरवळू द्या. 'आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा, पाव्यातला सुर जैसा ओठातून ओघळावा.'या ओळी सुंदर आवाजात गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अंधश्रद्धा ठेवून काहीही करू नका हृदयात श्रद्धा ठेवून करा. अभ्यास आणि श्रद्धा यात फरक आहे. महादेवाचे भक्त म्हणून विनाकारण आवडंबर माजवू नका. महादेवाची पूजा करताना प्रत्येक कृतीला महत्त्व आहे. भस्म, बेल गंध, त्रिपुंड, वाराची उत्पत्ती, विविध देवांचे वार, गाय, ब्राह्मण, देवयज्ञ, भगवान शंकराची पूजा, पंचगव्य, पंचामृत, पिंडीचे स्नान, मंत्रजप, भस्म महत्व आदी विषयावर शिव कथेचे प्रवक्ते ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांनी सखोल चिंतन करून आपल्या ओजस्वी वाणीतून सोप्या भाषेत शिवभक्तांना महत्व पटवून देऊन समजावून सांगितले. यावेळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, माजी नगराध्यक्ष विमलताई जेथलिया,आशिष जेथलिया,प्रवीण जेथलिया, नितीन जेथलिया, मनोहर खालापुरे, राजेश भुजबळ, दिलीप नहार, किसनराव मोरे, आनंद सोमानी, रामराव लावणीकर, शामसुंदर काळे,बाबाजी गाडगे,इंद्रजित घनवट, सचिन बोंबले,बाबुराव हिवाळे,अविनाश शहाणे,महेश दहिवाळ, राहुल सातोनकर,डॉ. काकडे, मंठा येथून आलेले सर्व प्रभात फेरी चे सदस्य,आरती चे मानकरी,सेवेकरी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात