📰 ताज्या घडामोडी

धनगर एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र पदरात पाडून घेण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र आले पाहिजे-प्रकाश सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य)

Shamsundar chittoda
7 फेब्रुवारी 2024⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज हा वेळोवेळी आंदोलन रस्ता रोको उपोषण करत आहे या अनुषंगाने धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारने लवकर करून धनगर समाजाच्या लेकरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा यासाठी बीड जिल्ह्यामधील वाडी वस्ती गावोगावी धनगर समाजाच्या घोंगडी बैठका प्रकाश सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात बैठका होत आहेत. गेले अनेक दिवसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धनगर समाज एसटी आरक्षणासाठी वेळोवेळी झगडत आहे परंतु या धनगर एसटी आरक्षणाची आतापर्यंत मागणी पूर्ण झाली नाही वाडी वस्ती तांडा खेडोपाड्यातील गाव गड्यातील युवकांनी व समाज बांधवांनी एकत्र येऊन धनगर एसटी आरक्षणाचा लढा हा महाराष्ट्रभर पेटून धनगर एसटी आरक्षणाचा धागा झाला पाहिजे जेणेकरून आपले युवक आरक्षण एसटी आरक्षण नसल्यामुळे बेरोजगार झाले आहेत जर आपल्याला या शासनाने एसटीचे आरक्षण अंमलबजावणी जर केली तर आपले हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी होतील यासाठी समाज बांधवांनी तुमचे गट तट बाजूला ठेवून या धनगर एसटी आरक्षण लढ्यामध्ये सामील झाले पाहिजे असे धनगर समाजाचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोनसळे यांनी समाज बांधवांशी बोलताना सांगितले

हीच वेळ आहे आपल्या मुलामुलींच्या भविष्याची, हीच वेळ आहे आपल्याला धनगर एसटी आरक्षण पदरात पाडून घेण्याची, हीच वेळ आहे एसटीचे दाखले हातात घेण्याची यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

राज्य सरकारने महाराष्ट्रातील धनगर एसटी आरक्षणाची दखल घेऊन धनगर समाजाच्या मागणीला न्याय द्यावा.

पाटोदा तालुक्यातील उखंडा, लिंबादेवी, भोंडवे वस्ती, पंचक्रोशीतील रोहतवाडी बेदरवाडी, वरझडी, निरगुडी धस पिंपळगाव, घुमरा पारगाव, पाचेगाव, दासखेड, या ठिकाणचे समाज बांधव हे देखील या घोंगडी बैठकीमध्ये सहभागी झाले होते .

यावेळी प्रकाश सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र),दत्तात्रय किवणे सरपंच,

श्याम गाडेकर धनगर समाज संघटना युवक जिल्हा उपाध्यक्ष ,गोविंद गोचाडे व्याख्याते , रामहरी सोनसळे,देवकते मधुकर,अरुण काकडे तालुका अध्यक्ष पाटोदा,नारायण महानोर सरपंच ,संजय भोंडवे कोषाध्यक्ष पाटोदा,विठ्ठल कोकाटे,पांडुरंग तागड सरपंच ,सयाजी लोकरे युवा नेते, राजेंद्र काकडे सरपंच,सूर्यकांत कोकाटे ,पत्रकार शरद शेजुळ , शिवाजी डफाळ माजी सरपंच,रवी माने ग्रामपंचायत सदस्य ,प्रतापगिरे ग्रामपंचायत सदस्य ,रामदास तागड ग्रामपंचायत सदस्य, सोमनाथ कुडवान, शिवलिंग प्रभाळे ,किसन गोदाजी सदर ग्रामपंचायत सदस्य,

हनुमान राहिंज,विजय काशीद, मल्हारी बंडगर, परशुराम सापणकर राजेंद्र काशीद ,राजेंद्र महानोर ,माऊली सोनसळे, सोनाजी किवणे ,युवराज मखर, डॉ.खिलारे साहेब ,श्रीनिवास सदगर,अभिषेक राहिंज,अभिषेक पोकळे,कुष्णा हजारे,बाळासाहेब हजारे,शुभम लांडे,सुरज भावले, खंडागळे ,मंगेश ठोसर,किंचक लोखंडे, आकाश चव्हाण, बाबुराव भोंडवे, रामनाथ डोळस,सतिष साबळे, संदिप शिंदे,विलास चव्हाण,बाळु लोखंडे अमोल भोंडवे तालुका अध्यक्ष धनगर समाज संघटना पाटोदा,

केशव भोंडवे उपसरपंच ,सुरेश वादगे ग्रामपंचायत सदस्य ,महादेव भोंडवे ,अनिल भोंडवे, अनु तात्या भोंडवे, सदाशिव भोंडवे ,उमाजी भोंडवे ,बप्पा वादगे ,डॉक्टर खिल्लारे ,अरुण भोंडवे ,ओमकार काळे ,धेंडूळे महाराज, माणिक दादा भोंडवे ,रोहन भोंडवे ,भीमराव भोंडवे ,रितेश कोकाटे, उत्तम वादगे ,विजय कुडके ,किशोर भोंडवे,किरण भोंडवे, केशव सोनसळे,वडगे सूर्यकांत,सारंग दादा भोंडवे,ललिता भोंडवे ,साखरबाई भोंडवे ,बायनाबाई भोंडवे, आशाबाई वादगे ,रत्नमाला भोंडवे, सुषमा भोंडवे,विश्वजीत भोंडवे, रिधान भोंडवे ,वैभव वादगे ,गणेश भोंडवे,

भोंडवे वस्ती, पिठ्ठी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात