📰 ताज्या घडामोडी

युवांनी अंनिसचे सभासद व्हावे-- डॉ. ठकसेन गोराणे

च
Shamsundar chittoda
29 डिसेंबर 2023•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना -महाराष्ट्र अंनिसच्या जालना जिल्हा व शहर शाखांचे कार्यकर्ते ,पदाधिकारी यांची बैठक नुकतीच जालना रेल्वे स्टेशन रोडवरील आपुलकी बेघर निवारा केंद्रात संपन्न झाली. त्यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे म्हणाले की, संघटितपणे समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक करणे असे काम मागील ३५वर्षांपासून महाराष्ट्र अंनिस समाजात करीत आहे. त्याचबरोबर व्यक्तीचे व्यक्तिमत्व विवेकी घडण्यासाठीही या कृतिशील विचारांचा फार मोठा उपयोग होतो, म्हणून या कामांमध्ये युवा वर्गाने जाणिवपूर्वक सहभागी होण्यासाठी अंनिसचे सभासद व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की अंनिसचे सभासद होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. देवाधर्माच्या नावाने होणारे शोषण, फसवणूक व दिशाभूल याला अंनिस विरोध करते, म्हणून या विचारांचा स्वतःबरोबरच कुटुंबाला आणि समाजालाही मोठा उपयोग होतो.

या बैठकीत संघटनात्मक व उपक्रमात्मक कामाबद्दल चर्चा होऊन नियोजन करण्यात आले. त्यामध्ये सभासद नोंदणी करणे, शाखा निवड प्रक्रिया राबवणे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे वर्गणीदार मिळवणे , ३१ डिसेंबर रोजी," द दारूचा नव्हे तर द दुधाचा" हा उपक्रम सार्वजनिक ठिकाणी राबविण्याचे नियोजन करण्यात आले.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात सर्व दूर पोहोचवणे कामी या संदर्भातील सर्व समाजातील साहित्यिकांच्या लेखन साहित्याचे एकदिवसीय साहित्य संमेलन जालन्यामध्ये आयोजित करण्याबद्दलचा विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे व जिल्हा अध्यक्ष वैशाली सरदार यांनी मांडला. कार्यकर्त्यांनी त्याला पाठिंबा देऊन, महाराष्ट्रातील मान्यवर लेखकांनाही या साहित्य संमेलनासाठी आमंत्रित करण्याबाबत चर्चा होऊन परिसंवाद, चर्चासत्र आयोजित करण्याचेही नियोजन करण्याचे ठरले.

जिल्हा कार्याध्यक्ष राजू खिल्लारे त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीस जिल्हा शाखेचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट राहुल बोबडे, बुवाबाजी विरुद्ध संघर्ष सचिव रंगनाथ थोरात,शेख मेहजबिन (पत्रकार),विनोद काळे, (पत्रकार),समाधान खरात(पत्रकार),समीर शेख,मोहमद रफिक शेख,प्रा सचिन निसर्गन, भरत चौधरी, आपुलकी चे संचालक अरुण सरदार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→29 डिसेंबर 2023
गोर सेनेचा वाटूर फाट्यावर रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प : विमुक्त जातीतील घुसखोरी थांबविण्याची मागणी

गोर सेनेचा वाटूर फाट्यावर रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प : विमुक्त जातीतील घुसखोरी थांबविण्याची मागणी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात