📰 ताज्या घडामोडी

तळणी येथील सकल मराठा समाज बांधवाचे साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात

Shamsundar chittoda
31 ऑक्टोबर 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तिनिधी | तळणी( रवि पाटील)

मंठा तालूक्यातील तळणी येथे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली होती याच साखळी उपोषणाचे रुपांतर आज मंगळवार पासून आमरण उपोषणात करण्यात आले आहे नानासाहेब खंदारे याच्या नेतृत्वात हे आमरण उपोषण आज पासून सुरू करण्यात आले तळणी परीसरातील पंधरा ते विस गांवाचा सहभाग या उपोषणात राहणार आहे

अंतरवाली सराटे येथे सुरू असलेल्या . मराठा आरक्षणाच्या या लढाई ला व मनोज जरांगे याना पाठबळ मिळावे या हेतुने सकल मराठा समाज या आंदोलनात सक्रीय झाला असल्याचे उपस्थित मराठा बांधवानी सांगीतले आहे तळणी परीसरातील तळणी वडगाव शिरपूर कोकंरबा देवठाणा उस्वद कानडी इंचा टाकळखोपा वाघाळा लिबंखेडा दुधा सासखेडा किर्ला हनवतखेडा व आणखी अन्य गावांचा सहभाग या साखळी उपोषणाला राहणार आहे सुरवातीला छञपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे एक मराठा कोटी मराठाच्या जयघोषाने बस स्टँन्ड परीसर दुमदुमून गेला

या आमरण उपोषणा सदर्भात जिल्हाधिकार्याना निवेदन देण्यात आले आहे

काल सोमवार रोजी मंठा तहसीलदार रुपा चिञक यानी भेट देऊन सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्य सोबत चर्चा कली व शातंता पूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचे आव्हाहन केले

तळणी येथून जवळच उस्वद येथील शाळकरी मुंलांनी आरक्षण मिळेपर्यन्त शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे काल वर्ग तिसरा ते आठवी पर्यन्तच्या विद्यार्थ्याच्या ऑनलाईन राज्य परीक्षाना सुरवात होणार होती परंतू विद्याथ्र्यानी शाळेतच न जाण्याचा निर्णय घेतला तसा व्हीडीओ समाज माध्यमांवर काल झळकला आहे

मराठा समाजाला जोपर्यन्त आरक्षण मिळत नाही तोपर्यन्त गावामध्ये सर्वपक्षीय नेत्याला येण्यास बंदी घालण्यात आली आहे तसा ठराव ग्रामपंचातीने घेतला आहे सकल मराठा समाज हे आंदोलन शांततेच्या मार्गाने लढत आहे सरकारने मराठा समाजाच्या भावना समजुन घेऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण समाजाला द्यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारू नये आपल्या समाजाचा इतीहास हा लढण्याचा आहे आत्महत्या सारखा चुकीचा मार्ग निवडून आपल्या स्वंकीयाना त्यामुळे आधिकच ञास होतो अशा भावना यावेळी उपस्थीतानी व्यक्त .केल्या आज सुरू या आमरण उपोषणाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात