📰 ताज्या घडामोडी

सलग २५ दिवसांपासून उस्वद गावांमध्ये साखळी उपोषणमराठा आरक्षण : परिसरातील गावकऱ्यांचाही सहभाग

च
Shamsundar chittoda
5 ऑक्टोबर 2023•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणी : प्रतिनिनिधी रवी पाटील

अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत उस्वद (ता. मंठा) येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. सलग २५ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून, परिसरातील गावकरी, समाजबांधव या उपोषणात सहभागी होत आहेत.

अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेला गोळीबार, लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता १९ सप्टेंबरपासून उस्वद येथील व्यंकेश्वर संस्थानातील सभागृहात सकल मराठा समाजबांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे. मंगळवारी दिनांक ५ आक्टोंबर रोजी उपोषणाला २५ वा दिवस होता. या साखळी उपोषणाला तळणी, देवठाणा , कानडी , वडगाव , कोकरंबा , शिरपूर , इंचा , खोरवड , आनंदवाडी , अंभोरा शेळके , किर्तापूर व दहिफळ खंदारे यांसह मंठा तालुक्यातील विविध गावातील तसेच विविध राजकीय , सामाजिक व मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला.

यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट ...

उस्वद येथील व्यंकेश्वर संस्थानातील सभागृहात सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाला परतूर- मंठा मतदारसंघाचे आ. बबनराव लोणीकर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र राज्य सदस्य डॉ. पुरुषोत्तम वायाळ, शिवसेना शिंदे गटाचे मंठा तालुकाध्यक्ष उदय बोराडे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सरकटे, कानडीचे प्रगतिशील शेतकरी नाना खंदारे, तळणीचे माजी उपसरपंच सुधाकर सरकटे, कानडी सरपंच कृष्णा खंदारे , सतीश सरकटे यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला.

तहसीलदार नाही आल्या मग , जिल्हाधिकारी येतील - मनोज जरांगे पाटील

उस्वद येथील साखळी उपोषणाला मंठा तहसीलदार रूपा चित्रक यांनी भेट न दिल्यामुळे संतप्त सकल मराठा उपोषणकर्त्यांनी तहसीलदारांचा निषेध केला . होता पंरतू मगळवारी राञी मंठा तहसीलदार रुपा चित्रक यानी राञीच्या वेळी उपोषण स्थळी भेट दिली श्री. मनोज जरांगे पाटील यांनी तहसीलदार नाही आल्या मग , उस्वदला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना बोलुन भेटीला पाठवतो. असं म्हणत उस्वद येथील साखळी उपोषणकर्त्याचे मनोबल वाढवले होते

14 आक्टोबर ला होणार्या जंगी सभेसाठी तळणी सह सपूर्ण परीसरात जय्यत तयारी सुरु आहे तळणी येथे तरुण घरोघरी जाऊन चौदा तारखेच्या सभेचे नियोजन करत आहे या सभेची पूर्व तयारी ची बैठक नुकतीच तळणी येथे पार पडली वाहनाचे नियोजन येणार्याची संख्या मोठी असल्याने त्या अनुषंगाने तळणी परीसरात नियोजन लावण्यात सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्य व्यस्त आहे

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 ऑक्टोबर 2023
एकच पर्व ओबीसी सर्व जय घोषणेने परतूर शहरात ओबीसी चा जोरदार शक्ति प्रदर्शन परतुरात ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा सह ठिय्या आंदोलन                     परतूर: शहरात मोटारसायकल रॅलीला मोठा प्रतिसाद

एकच पर्व ओबीसी सर्व जय घोषणेने परतूर शहरात ओबीसी चा जोरदार शक्ति प्रदर्शन परतुरात ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा सह ठिय्या आंदोलन परतूर: शहरात मोटारसायकल रॅलीला मोठा प्रतिसाद

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात