📰 ताज्या घडामोडी

अमृत महोत्सव निमित्त स्वातंत्र्य सेनानी कुटुंबाचा सत्कार , भारतीय स्टेट बँकचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांचा स्तुत्य उपक्रम

Shamsundar chittoda
17 जुलै 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मराठवाडा स्वातंत्र्यसंग्राम मधील स्वातंत्र्य सेनानी स्वर्गवासी काशिनाथ तुळशीराम वराडे यांच्या धर्मपत्नी पार्वतीबाई काशिनाथ वराडे यांचा आजादी का अमृत महोत्सव हे वर्ष साजरे करताना भारतीय स्टेट बँक शाखा परतूरच्या वतीने शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार दि १५ जुलै २०२३ रोजी करण्यात आला. यावेळी भारतीय स्टेट बँकचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी, उप प्रबंधक मनोहर गावडे, कर्मचारी इमरान खान, प्रवीण दुधाट, आदर्श ताम्हणे, मनीषा कांबळे, प्रतिष्ठित नागरिक गंगाधर पवार, यांची उपस्थिती होती.

भारतीय स्टेट बँक शाखा परतूरच्या वतीने पार्वतीबाई वराडे यांचा सत्कार करतांना मुख्य प्रबंधक अतुल सावजी, उप प्रबंधक मनोहर गावडे, कर्मचारी इमरान खान, प्रवीण दुधाट, आदर्श ताम्हणे, गंगाधर पवार आदि

यावेळी मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांनी आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्य सैनिकाचे महत्त्व त्यांनी समाजासाठी केलेला त्याग व त्यांच्या या अथक परिश्रमामार्फत मिळालेले स्वातंत्र्य भावी पिढीला कळावं. त्या पिढीचा स्वातंत्र्य सेनानी कुटुंबाचा विसर समाजाला पडलेला चाललेला दिसत आहे. तो पडू नये यासाठी हा नवीन उपक्रम स्टेट बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आला. तसेच बँकेच्या ग्राहकासोबत असलेले संबंध आणखीन सुदृढ व्हावे यासाठी भारतीय स्टेट बँके येणाऱ्या काळात नवीन प्रकारचे उपक्रम भारतीय स्टेट बँकेकडून राबवले जातील असा विश्वास अतुल सावजी यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केला. भारतीय स्टेट बँके ग्राहकांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला भारतीय स्टेट बँकेचा सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात