📰 ताज्या घडामोडी

परतूर व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी निवेदन

च
Shamsundar chittoda
12 मे 2023•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र मध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून परतूर पत्रकारांच्या वतीने धरणे आंदोलन करून मागण्यांकडे लक्ष वेधण्याची मागणी करण्यात आली आहे.

पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. पत्रकारितेत पाच वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा. पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. या मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष भारत सवने, सरचिटणीस सागर काजळे, अजय देसाई, आशिष गारकर, सय्यद वाजेद, सय्यद तयब, कार्याध्यक्ष रामप्रसाद नवल, आशिष धुमाळ, श्यामसुंदर सोनी, केदार शर्मा, इम्रान कुरेशी, तारेख शेख, मुमताज अन्सारी, पांडुरंग शेजुळ, अर्जुन पाडेवार, राजकुमार भारूका, एम एल कुरेशी, सरफराज नाईकवाडी, विष्णू सोळंके, मोहन सोळंके, उद्धव डोळस, एकनाथ राऊत, हारूण कच्छी, दत्ता लवंगारे, अशोक दहिभाते, राजेश नाईक, राहुल आवटे, कैलास भदर्गे यांच्यासह अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→10 मे 2023
जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्याने जालना शहराचा विकास अधिक तीव्र गतीने होईल - आमदार लोणीकर, जालना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला होता ठराव पास

जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्याने जालना शहराचा विकास अधिक तीव्र गतीने होईल - आमदार लोणीकर, जालना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला होता ठराव पास

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात