📰 ताज्या घडामोडी

नाल्यांच्या साफसफाई साठी स्वच्छता अभियान राबवा:-सचिन खरात

Shamsundar chittoda
19 मे 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्ठिने नगर पालिका प्रशासनाने परतुर शहरात नाल्यांची साफसफाई करून जंतू नाशक फवारणी करुण घ्यावी सोबत घाणीची विल्लेवाट लावण्यासाठी शहरात मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी *शिवसंग्राम संघटनेने तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी नगर पालिका प्रशासनाकडे केली आहे*

शिवसंग्राम संघटनेने पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, संपूर्ण शहरात वॉर्डासह मुख्य रस्तावर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सदर घाणीची विल्लेबाट लावणे आवश्यक आहे. जेणे करून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न उदभावणार नाही. मे महिना संपल्यानंतर मान्सून ची सुरुवात होणार आहे. आशा परिस्थितीत शहरातील नाल्यांची साफसफाई होणे ही तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा नेहमी प्रमाणे पहिल्या पावसातच नाल्यांचे पाणी रस्त्यावर येणार यात शंका नाही. वेळेत जर नाल्यांची साफसफाई केली तर पुढील मान्सून काळातील समस्यांचा सामना शहरवासियांना करावा लागणार नाही. मात्र नगर पालिका प्रशासन पावसाळ्याच्या तोंडावर थातूर मातूर स्वच्छता मोहीम राबविते. परिणामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे शहरवासियांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने पालिका प्रशासनाने शहरातील घाणीची विल्लेवाट लावावी, शहरात जंतू नाशक फवारणी बरोबर मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई करावी यासाठी शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा आंदोलन करू अशी मागणी नगर पालिका प्रशासनाकडे शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात मनोज वटाने संदीप खवल अमुत राठी सखाराम माठे आदींनी केली आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात