📰 ताज्या घडामोडी

कोकाटे हादगाव तांडा येथे गावठी हातभट्टी दारुचा अड्डा उध्वस्त,आष्टीचे सपोनि सोमनाथ नरके यांची धडाकेबाज कारवाई

Shamsundar chittoda
15 मे 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव तांडा येथे आष्टी पोलिसांनी दि १४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता छापा मारून गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून दारू नष्ट करून एका विरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आष्टी पोलिसांच्या या कारवाईने अवैध धंदे चालकाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कोकाटे हदगाव तांडा येथे एक इसम त्याच्या घरासमोरील पत्राच्या कुडामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करून विक्री करीत असल्याची माहिती आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांना मिळाली तात्काळ पोलिसांचा फौजफाटा घेऊन कोकाटे हादगाव तांडा येथे खाजगी वाहनाने जावून गाड्या गावाच्या बाहेर उभ्या करुन लपतछपत मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी हातभट्टीच्या अड्डावर छापा मारला असता याठिकाणी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळाचे रसायण सडवा बाळगुन, गावठी हातभट्टी दारु तयार करून तिची विना परवाना चोरटी विक्री करतांना भिमराव देवू राठोड, वय 47 वर्ष, रा. कोकाटे हादगाव याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून

अडीच हजार रुपये किमतीची दोन प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे पन्नास लीटर उग्र आबंट हातभट्टी दारु, तसेच

पाचशे रुपयांचा दोन प्लास्टीक कॅन, दहा हजार रुपयांच्या एका प्लास्टीक ड्रममध्ये अंदाजे दोनशे लीटर हातभट्टी दारु तयार करण्यासाठी बनवीलेले सडलेले गुळाचे रसायण सडवा, आणि पाचशे रुपयांचा एक ड्रम असा एकूण तेरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून भिमराव देवू राठोड यांच्या विरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आर.डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ नरके, *सपोउपनिरीक्षक डी.एस जाधव,* पोकॉ राणोजी पांढरे, पोहेकॉ राठोड, पोकाँ. सज्जन काकडे यांनी केली आहे. या कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात