📰 ताज्या घडामोडी

शिक्षकानी काळानुसार बदल करावा-कपील अकात

Shamsundar chittoda
2 मार्च 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेत काम करणारे सर्व कर्मचारी हे आकात कुटुंब आहे. प्रत्येक कर्मचारी हा आकात कुटुंबातील सदस्य आहे. शिक्षकांनी संस्थेत अध्यापण करीत असतांना काळानुसार बदल करावा असे आवाहन संस्थेचे सचिव कपिल आकात यांनी केले. ते येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात मुख्याध्यापक वसंत सवने यांच्या सेवागौरव कार्यक्रमात बोलत होते.

... मुख्याध्यापक वसंत सवने यांना सेवानिवृत्त कार्यक्रमात सेवागौरव करतांना संस्थेचे सचिव कपिल आकात अध्यक्षा आशाताई आकात, माजी जी.प सदस्य अमृतराव सवने, जी.प.सदस्य शिवाजी सवने, आदि

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आशाताई आकात, माजी जी.प सदस्य अमृतराव सवने, जी.प.सदस्य शिवाजी सवने, हनुमंत काटमोडे, सुधाकर सवने, दैठना खू. सरपंच सुनील तायडे, येनोरा सरपंच उद्धव जोगदंड, संतोष डव्हारे, उतमराव खरात, सुभाषराव सवने, अरुण बाहेती, पंडित भूबर, दैठना खू. उपसरपंच राजेश काटकर, यशवंत दुबाले, शरद पाटील, यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना सचिव कपिल आकात म्हणाले की काम करीत असतांना स्व. बाबासाहेब आकात यांच्या निधनानंतर शैक्षणिक संस्थांच्या कर्मचारी यांच्या बळावर संस्थेची घोडदौड सुरू आहे. शिक्षकांनी संस्थेत एकत्र काम करीत असतांना विद्यार्थी दैवत म्हणून काम केल्यास विद्यार्थ्यांची व संस्थेची नक्कीच प्रगती होईल. शिक्षकांनी जागरूक राहून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थीना मन लावून शिकवावे आणि ध्येय समोर ठेऊन शिक्षकांनी काळानुसार बदल करावा. शिस्तबद्ध नियोजन करून संस्थेची यशस्वी वाटचाल करण्याचे आवाहन कपिल आकात यांनी केले. यावेळी संस्थेचे शिक्षक कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषराव वायाळ यांनी केले. तर सूत्रसंचलन श्रीमती चंदा लड्डा यांनी तर आभार राजकुमार राऊत यांनी मानले.

*चौकट*

सेवागौरव कार्यक्रमात मुख्याध्यापक वसंत सवने अश्रू अनावर

सेवागौरव कार्यक्रमात मुख्याध्यापक वसंत सवने आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले असता त्यांना भावुक होत कंठ दाटून येत अश्रू आणावर झाले. मराठवाडा सर्वोदय शिक्षण मंडळात काम करीत असतांना शिक्षक म्हणून काम आणि तसेच मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळत असतांना संस्थेच्या व विद्यार्थी हिताचे काम करीत राहिलो. आणि आज २८ वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे. कुठलेही व्यसन न करता शाळे बाबत परीक्षा नियोजन, निकाल, शिस्त, शालेय पोषण आहार, प्रशाकीय व्यवस्थापन काम चोखपणे पार पाडण्यासाठी रात्र दिवस झटलो. काम करीत असतांना सर्वांच्या सहकाऱ्याने काम पूर्ण करू शकलो असे यावेळी बोलतांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत सवने यांनी सांगितले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात