📰 ताज्या घडामोडी

समाज ऋणातून उतराई होण्यासाठी नेहमीच आपले विकासासाठी प्रयत्न - आमदार लोणीकर*, सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केल्याने जीवन सोन्यासारखे उजळते - आमदार लोणीकर,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त परभणीत सोनार समाज वधु वर परिचय मेळावा संपन्न

Shamsundar chittoda
5 मार्च 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

समाजात गरीब श्रीमंत अशा सर्वच घटकातील मुला मुलींचे विवाह हे सामूहिक विवाह सोहळ्यातच करणे ही काळाची गरज आहे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून हजारो मुलींचे कन्यादान केल्याने मंत्री पदा पर्यंत पोहोचण्याचा आशीर्वाद मिळाला सामूहिक विवाह सोहळा सोहळ्यात विवाह करणाऱ्यांचे जीवन सोन्यासारखे उजळते हा स्वतः घेतलेला सामूहिक विवाह सोहळ्यातील अनुभव आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात 5 मार्च रोजी दुपारी बारा वाजता माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त सोनार समाजाचे राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक चंद्रकांत ढाळे यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार एडवोकेट सुरेशराव जाधव ह भ प मौनी उर्फ अंबादास दहिवाळ महाराज भाजपा महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, डॉक्टर प्रफुल्ल पाटील, गोविंद अजमेरा, धनराजजी विसपुते, सुधाकरराव धानोरकर, अनिल शेठ, प्रभाकर कुलथे, कृष्णा अष्टीकर, नितीन अष्टीकर, बालाजीराव उदावंत, सुवर्णा ताई लोलगे, दिलीप शहाणे, अजय डहाळे, अशोकराव डहाळे, प्रकाशराव मोरे, हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिभेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. आयोजक चंद्रकांत डहाळे व अक्षय डहाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सन्मानपत्र व भव्य असे पुष्पहार आणि सत्कारमूर्ती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना आयोजक चंद्रकांत डहाळे म्हणाले की लोणीकर यांच्यामुळे भाजपा पक्षात काम करण्याची संधी मिळाली लोणीकर हे दिलेले शब्द पाडणारे नेते आहेत सोनार समाजाचे अनेक प्रश्न असून या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे त्यासाठीच समाजाचे राज्य अधिवेशन घेण्याचा मानस असून या अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा मानस आहे वधू वर परिचय मेळावा हा केवळ गरिबांसाठी असतो ही मानसिकता बदलायला हवी या मेळाव्यात प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांसाठी जोडीदार निवडून सामूहिक विवाह सोहळ्यातच विवाह सोहळा करावा ही काळाची गरज असल्याचे चंद्रकांत डहाळे यांनी यावेळी सांगितले पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की विवाह घडून आणण्यासाठी गरिबांचे घर शेती जाते अनेक पालक कर्जबाजारी बनतात हे थांबवायला पाहिजे यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन झाले पाहिजे सोनार समाज हा शंभर नंबरी जरी असला तरी देखील या समाजातही अनेक लोक गरीब आहेत त्यांच्यासाठी चंद्रकांत ढाळे यांच्यासारखे रत्न समाजसेवेत कार्यरत राहिला हवेत चंद्रकांत डहाळे, हे माझ्या हजार मित्रांपैकी एक आहेत त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत माझी साथ राहील असा विश्वास त्यांनी देऊन सन्माना बद्दल आयोजकाचे आभार मानून वधू वर परिचय व विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वधू-वरांना शुभेच्छा दिल्या या युवा सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने सोनार समाज बांधव ही उपस्थित होता.

वेळी व्यासपीठावर परभणी चे माजी खासदार सुरेश राव जाधव, मौनी बाबा अंबादास महाराज डॉ प्रूफ्फल पाटील आनंदाराव भरोसे अष्टेकर आप्पा धानोकर पंजाबराव बोराडे संपतराव टकले रमेशराव भापकर शिव्हारी खिस्ते ज्ञानेश्वर माऊली शेजुळ शत्रुघन कणसे गजानन उफाड सोमनाथ सातपुते मधुकर मोरे मनोज देशमुख उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात