चार दिवसापासून परतूर येथील साठे नगर भागात पिसाळलेलं वानर हे साठे नगर परिसरात साठे नगर येथील सर्व रहिवाशांना परेशान करत आहे
साठे नगर येथील चार बालकांना त्या वानरांनी चावा घेतलेला आहे मंथन विजय वाणी रुद्र अशोक हिवाळे संजना अनिल साठे कल्पेश राहुल आरसाड असे चावा घेणाऱ्या मुलांचे नावे आहेत ही बाब कळतात नगरसेवक बाबुरावजी हिवाळे यांनी वन विभाग च्या अधिकाऱ्याला याबाबतची माहिती देतात वन विभाग यांना एका निवेदनामध्ये त्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची विनंती अर्ज केला आहे तसेच या फिसळलेल्या वानराला लवकरात लवकर पकडून देऊ तसेच जखमी झालेल्या कुटुंबाला मदतीचा आश्वासनही असा शब्दही वन विभागाच्या अधिकाऱ्याने नगरसेवक बाबुरावजी हिवाळे यांना दिला आहे यावेळेस निवेदन देताना नगरसेवक बाबुराव हिवाळे भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष विष्णूजी कसारे अशोक हिवाळे लक्ष्मण साठे अशोक हिवाळे सनी गायकवाड इत्यादी लोकांच्या या निवेदनावर सह्या आहेत
