📰 ताज्या घडामोडी

स्वच्छता अभावी नागरिक दुर्गंधीने त्रस्त, परतूर नगरपालिकेचे दुर्लक्ष.

Shamsundar chittoda
9 फेब्रुवारी 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर/ सरफराज नाइकवाडी.

परतूर शहरातीलगाव भागातील नाइकवाडी गल्ली, धनगर गल्ली. माली गल्ली, परकोटा गल्ली, याभागात स्वच्छता होत नसल्याने येथे नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत असून, या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे, तसेच दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, परंतु परतूर नगर परिषदेचे नाल्याची साफ सफाई व स्वच्छतेकडे दुर्लक्ष असून, नगरपरिषदेला नागरिकांच्या आरोग्याशी काही देणे घेणे नसल्याचे चित्र दिसत आहे, यादुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत, याभागातील नगर सेवकांनी देखील येथील नागरीकांच्या समस्यांकडे हात वर केलेले आहेत, अंदाजे दीड वर्षापासून परतूर नगर परिषदचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे, पालीकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहे, मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची इतर ठिकाणी बदली झालेली आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील स्वच्छता सफाईकडे नगर परिषदेचे कर्मचारी लक्ष देत नसल्याने ही अवस्था झालेली आहे. सर्वसामान्य नागरीक त्रस्त झालेले आहे. नगर परिषदेने नागरिकांच्या आरोग्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे. दुर्गंधीमुळे जनता त्रस्त झालेली आहे. मुख्य अधिकारी पदाचा तातपुरता पदभार मंठा येथील मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना देण्यात आलेला आहे. कायम स्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगर परिषदेत नागरीकांच्या तक्रारी कोणी एकत नाही, तक्रार घेण्यासाठी कोणी अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आता कुणाकडे तक्रार करावी हेच समजत नाही, प्रशासक म्हणून अंदाजे दीड वर्षापासून परतूर येथील उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव हे नगर परिषदेचा कारभार पाहत आहे, परंतु शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष असल्याचे दिसत नाही, तसेच परतूर नगर परिषदेतील मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची मागील दोन-तीन महिन्यापूर्वी राजकिय वादातून बदली करण्यात आल्याचे समजते म्हणून या जागेवर मंठा येथील मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना तात्पुरता पदभार देण्यात आलेला आहे. मुख्याधिकारी बैरागी यांचा कार्यकाळ सुद्धा मंठा येथे पारदर्शक राहिलेला नाही, त्यांच्याबाबत तेथील नागरिकांच्या खूप तक्रारी आहेत, मात्र त्यांना परतूर येथील नगरपरिषदेचा देखील तात्पुरता चार्ज देऊन प्रशासनाने परतुर येथील नागरिकांच्या डोळ्यावर पाणे पुसली आहे, सर्वसामान्य नागरीकांना दैनंदिन गरजा अवशयकता आहे स्वच्छतेची सफाईची, जिल्हाधिकारी यांनी याबाबत नागरीकांच्या समस्यांची दखल घेत त्वरित स्वच्छतेचे आदेश द्यावेत अशी येथील नागरिकांची मागणी आहे,

कोटः- नागरीकांच्या समस्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे, याभागात स्वच्छता होत नसल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. नाल्या व ढापे फुटल्याने यातील घानपाणी मुख्य रस्त्यावर येत आहे. यामुळे दुर्गंधी वाढली आहे गटार योजनेचे काम बंद पडले आहेत मुख्य रस्ते यामुळे खराब झालेत, याकामाकडे लोकप्रतिनिधी देत नाहित, परवेजखान पठाण नागरीक.नाइकवाडी गल्ली परतूर.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात