📰 ताज्या घडामोडी

चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले,परतूर पोलिस आणि चोरट्यांचा मसाला शिवारात अंधार्‍या रात्री थरार

Shamsundar chittoda
25 फेब्रुवारी 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

पोलिस चोरांचा पाठलाग करून चोरट्यांना पकडत असल्याचे सिनेमात अनेकदा पाहिले आहे. मात्र परतूर पोलिसांनी सिनेमातील हकीकत सत्य घटनेत उतरवून दाखवीले

याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसापासून टाटा सोलर प्लांट येथे चोरीच्या घटना घडत आहे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शंकर गोपीनाथ जईद (सेक्युरीटी गार्ड सोलर प्लॉन्ट मसला) यांनी फिर्याद दिली की नेहमी प्रमाणे रात्र पााळीवर असतांना दिनांक 22 फेब्रुवारी रात्री साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम हे सोलार प्लांटमध्ये केबल चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले बॅटरीच्या उजेडात केबल कापताना दिसून आले. त्यांनी जोरात ओरडुन आवाज दिला असता तोडलेले केबल जागेवरच टाकुन चोरट्यांनी पळ काढला. त्या अनुषंगाने परतुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कैठाळे यांनी पथक स्थापन केले व चोरांच्या मुस्क्या आवळण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या दिनांक 23 फेब्रुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोकॉ गजानन राठोड यांना गुप्त माहितीगारा कडून माहिती मिळाली की मसाला शिवारातील प्लांट मध्ये तीन चार इसम प्लांट मध्ये घुसून वायर चोरी करत आहे तदनंतर पोका राठोड यांनी तात्काळ याबाबत पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना माहिती दिली व लगेच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पवार,गजानन राठोड अमोल गायकवाड अचित चव्हाण शाम्युअल गायकवाड दशरथ गोपणवाड परमेश्वर माने होमगार्ड बेरगुडे, काकडे, ठाकूर यांनी सदर ठिकाणी सापळा रचला काही वेळाने चोरट्यांना पोलिसांनी घेरले असल्याचे समजताच चोरट्यानी पळ काढला पोलिसांनी जीवाची पर्वा नकारता त्यांचा पाठलाग सुरु केला चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना पोलिसांनी झडप घालून गोविंद लड्डू काळे, सुनील सुजान काळे राहणार परतुर व अनुप गोडाजी चव्हाण राहणार औरंगाबाद यांना पकडून त्याच्याकडील मुद्देमाल हस्तगत करून अटक करून न्यायालयासमोर गुरुवारी हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती परतुर पोलिसांनी दिली या कारवाईने पोलिसांनी केलेल्या कामगिरी चे कौतुक होत आहे पुढील तपास पोहेका इस्माईल शेख हे करीत आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात