अठ्ठावीस जानेवारी. हा दिवस संपुर्ण जगात जागतिक सुर्यनमस्कार दिन म्हणुन साजरा केल्या जातो.
शासन निर्देशाप्रमाणे आज श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा [ माव ] या प्रशालेत. मोठ्या ऊत्साहात सुर्यनमस्कार करुन हा दिवस साजरा करण्यात आला.
सुर्यनमस्कार हा सर्वांगीन व्यायामाचा शास्त्रशुध्द प्रकार असुन प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज सुर्यनमस्कार घालुन शरीर बळकट व मजबुत करणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले.
सुर्य नमस्काराच्या विविध पायर्या विद्यार्थ्यांना सहशिक्षक श्री आबासाहेब गाडेकर व श्री भास्कर कुळकर्णी यांनी समजुन सांगितल्या.
तत्पुर्वी कार्यक्रमाचे ऊद्घाटन मंडळाचे कोषाध्यक्ष श्री प्रभाकर कादे यांचे हस्ते सरस्वती पुजण करुन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री रोकडे , सातपुते , खवल , जोशी , खरात , वखरे या कर्मचारी बंधुनी परीश्रम केले.
