📰 ताज्या घडामोडी

दैठना खुर्द येथील ग्रामसेवक गावात फिरकेना

Shamsundar chittoda
25 जानेवारी 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तालुक्यातील दैठना खुर्द येथील ग्रामसेवक आर.बी मेहत्रे हे गावात गेल्या तीन आठवड्या पासून आले नसल्या गावकर्‍याची कामे खोळंबल्याने ग्रामस्थामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाने ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी गावचा सचिव म्हणून ग्रामसेवक यांची नियुक्ती केली आहे. मात्र ग्रामसेवक गावाच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गावातच नसल्याने शासनाच्या उद्देशाला हरताळ फासण्याची काम ग्रामसेवक यांच्याकडून होत असतांना वरिष्ठ मात्र बघ्याची भूमिका घेऊन ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याने गावाच्या समस्येकडे तसेच नागरिकांच्या खोळंबलेल्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने हम करेसो कायद्या प्रमाणे वागत असल्याने याला लगाम घालण्याची मागणी होत आहे.

शासनाकडून गाव विकास करण्यासाठी थेट ग्रामपंचायतच्या खात्यात निधी वर्ग करून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न होत असतांना शासन आणि लोकप्रतिनिधी यांचा दुवा म्हणून काम करणारे ग्रामसेवक हे विकास कामात आणि नागरिकांच्या कामात गावात न येता खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने अश्या ग्रामसेवकावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करून जरब बसविण्याची मागणी ग्रामस्थाकडून होत आहे. दैठना खुर्द येथील एका ग्रामसेवकाकडे हातडी, क-र्हाळा, तीन गावाचा पदभार असल्याने तिन्ही गावात ग्रामसेवक नियमित येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून ग्रामसेवक हे मुख्यालयी न राहता जालना येथून अपडाउन करीत आहे. मागील काळात केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

या बाबत ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. तसेच विस्तार अधिकारी वाय.यू परदेशी यांना विचारले असता ग्रामसेवक हे पंचायत समिति कार्यालयात मंगळवारी उपस्थित होते. मात्र गावात येत नसेल तर त्या बाबत कळविण्यात येईल असे सांगण्यात आले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात