📰 ताज्या घडामोडी

शासनाकडून शेतकऱ्याला पन्नास हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान खात्यात जमा , परतूर : एसबीआय बँकेचा शेतकरी ठरला पहिला मानकरी

Shamsundar chittoda
4 डिसेंबर 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतुर तालुक्यातील शेवगा येथील शेतकरी भास्कर मारोती धुमाळ या शेतकऱ्याने नियमित पीक कर्ज भरल्याने एसबीआय बँकेकडून या शेतकऱ्यास शासनाच्या योजनेचा पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

परतुर शेवगा येथील शेतकरी भास्कर धुमाळ यांनी नियमित कर्ज भरल्याने पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मिळाल्याने सत्कार करतांना एसबीआयचे उपप्रबंधक मनोहर गावडे, कृषी अधिकारी प्रवीण दुधाट, कर्मचारी सह शेतकरी. दिसत आहेत.

शासनाने शेतकर्‍यांना थकीत कर्जदार यांना महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर करून लाभ देण्यात आला. तर नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यात परतूर भारतीय स्टेट बँकेचे नियमित कर्ज भरणारे शेतकरी भास्कर धुमाळ यांचा स्टेट बँकेचे उपप्रबंधक मनोहर गावडे यांच्या हस्ते पन्नास हजार रुपये अनुदान खात्यात जमा करून शेतकर्‍यांचा गावात जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्टेट बँकेचे कृषी अधिकारी प्रवीण दुधाट, कृषी सहाय्यक गणेश जाधव, महादेव थोरात, विलास धुमाळ, सह शेतकरी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपप्रबंधक मनोहर गावडे, कृषी अधिकारी प्रवीण दुधाट, यांनी शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड करून होणारे फायदे व थकीत असलेल्या शेतकर्‍यांचे होणारे नुकसान यांची माहिती दिली. आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात