📰 ताज्या घडामोडी

परतूर येथे नवीन दहा अंगणवाडी देण्याची नरेश कांबळे यांची मागणी

च
Shamsundar chittoda
17 नोव्हेंबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण परतूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिव वाढत चालली आहे पण लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा येथे खूप कमी अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविका यांच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त नोंदणी करण्याची मागणी होत आहे तसेच शहरातील गरोदर मातांचे प्रमाण वाढत असून सुध्दा त्याप्रमाणात या महिलांना लसीकरण, तसेच इतर संदर्भसेवा मिळत नाहीत व नवजात बालक यांना सुद्धा लसीकरण, पोषक आहार तसेच संदर्भ सेवा पोचवणे अडचणीचे होत आहे.

यामुळे पोषक आहाराअभावी नवजात शिशू हे कुपोषित होण्याची शक्यता वाढत आहे. यामूळे आपण या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन परतूर शहराला नवीन दहा अंगणवाडीची मान्यता देऊन अंगणवाडी सेविका व मदतनिस भरती प्रक्रीया करून परतूर शहराची अडचण सोडविण्याची विनंती येथील सामाजिक कार्यकर्ता नरेश रामभाऊ कांबळे यांनी निवेदनाद्वारे आपणास केली आहे, नरेश कांबळे हे कित्येक वर्षापासून या मागणीचा पाठपुरावा करत आहेत.

एकात्मिक बाल विकास योजना जालना कार्यालयात श्रीमती गुट्टे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→17 नोव्हेंबर 2022
परतूर येथे शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

परतूर येथे शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात