📰 ताज्या घडामोडी

परतूर तालुका क्रीडा संयोजक पदी प्रमोद राठोड यांची निवड ,परतूर येथे तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२२-२३ नियोजन बैठक संपन्न

Shamsundar chittoda
10 ऑक्टोबर 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर: क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना तसेच तहसील कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालय परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने परतूर येथे तालुकास्तरीय शालेय तसेच क्रीडा स्पर्धा 2022-23 चे आयोजन व नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाली.

या बैठकीस तालुका क्रीडा अधिकारी रेखा परदेशी मॅडम,गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष साबळे साहेब, गटसमन्वयक कल्याण बागल , निवृत्त क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी ,नवनियुक्त क्रीडा संयोजक प्रमोद राठोड ,परतूर क्रीडा समितीचे अध्यक्ष निर्वळ सर आदी उपस्थित होते.

त्याच बरोबर परतूर तालुक्यातील विविध शाळेचे क्रीडा शिक्षक त्यामध्ये काकडे व्ही जी, कबाडी एस एल, कोरडे ए डी, तन्वीर शेख, नवल आर एम, विकास काळे, राठोड व्ही एच, सरदार एन एस. गायकवाड व्ही एस, देवडे व्ही ए, गिरी बी के, खान माजीद परतुरी, नलावडे एन एस, गीते जे एन,. सिरसाठ बी व्ही, श्री.आढे पीबी,श्री.भांडवलकर ए सी, देशमुख के वाय, कुकडे जी आर इत्यादी क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.

परतूर तालुक्यातील विविध शाळातून आलेले शारीरिक शिक्षक तसेच क्रीडा प्रेमी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या दहा क्रीडा स्पर्धेच्या आयोजना संदर्भात तसेच विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच दिवाळीच्या सुट्ट्यानंतर ९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान या दहा खेळ प्रकारांच्या स्पर्धा आयोजनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

या बैठकीस तालुका क्रीडा अधिकारी, श्रीम रेखा परदेशी मॅडम यांनी क्रीडा विभागाच्या विविध योजना व क्रीडा स्पर्धा बाबत मार्गदर्शन केले तर निवृत्त क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी सर यांनी क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या बाबतीत मार्गदर्शन केले तर सर्वात शेवटी गटशिक्षणाधिकारी श्री.संतोष साबळे साहेब यांनी परतूर तालुक्यातील सर्वच शाळा यांनी क्रीडा स्पर्धा मध्ये सहभाग घ्यावा अशा सूचना तालुक्यातील मुख्याध्यापक यांना केल्या व परतूर तालुक्यातील सर्व क्रीडा स्पर्धा उत्कृष्ट पध्दतीने पार पाडू अशी ग्वाही सर्वानुमते देण्यात आली.

सदरील बैठकीत सूत्रसंचालन जावेद पठाण सर यांनी केले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात