📰 ताज्या घडामोडी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग व बांबू लागवड योजनेचे अर्ज तात्काळ ऑनलाईन करा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Shamsundar chittoda
28 सप्टेंबर 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जागतिक बँकेच्या मदतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारा प्रकल्प सुरू केला होता या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय करण्यात आला होता त्यानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा या योजनेमार्फत दिल्या जातात मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पातील अनेक योजनांवर बंधने घालण्यात आली होती तसेच शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या अनेक योजनांची अनुदान देखील प्रलंबित होते नवीन योजना करावी की न करावी अशा प्रकारची द्विधावस्था शेतकऱ्यांची होती परंतु आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस यांच्या रूपाने शेतकऱ्यांचे सरकार आलं असून शेतकऱ्यांनी फळबाग व बांबू लागवड करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत फळबाग व बांबू लागवड अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ असून त्यानंतर पोर्टल वरील फळबाग व बांबू लागवड घटक त्यानंतर बंद होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप फळबाग /बांबू लागवड करता अर्ज केले नसतील त्यांनी लवकरात लवकर या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घ्यावा. असे आवाहन देखील लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केलं आहे.

सर्व लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी यांनी आपल्या परिसरातील गावातील तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आपल्या स्तरावरून फळबाग लागवडीचा संदेश देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्यासाठी प्रयत्न करावेत सर्व कृषी सहाय्यक व समुह सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना अर्ज ऑनलाईन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी असेही माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सुचित केले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात