📰 ताज्या घडामोडी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात तुलसी महिला प्रभागसंघाची 'वृक्ष दिंडी'(स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्षदिंडी सह महिला बचत गटांना तीन लक्ष रुपयाचे कर्ज वितरित)

च
Shamsundar chittoda
13 ऑगस्ट 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

दि.१३ स्वातंत्र्याचा '75' अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला तुलसी महिला प्रभागसंघ केंधळी च्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे औचित्य साधून वाजोळा पू येथे (ता १२) 'वृक्ष दिंडी हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करून सर्व गाव भर प्रभात फेरी काढून 'तक्षशिला' विहराच्या मैदानावर बचत गटाच्या महिलांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी पंचायत समितीचे सहाय्य गटविकास अधिकारी पी एस तायडे,कृषी अधिकारी जाधव, विस्तार अधिकारी वी पी पाटील , ग्रामसेविका एम एम वडगावकर मॅडम, उमेद चे रवींद्र वाघमारे, श्याम खोंड , प्रभाग समनव्यक अनिल मोरे , समाधान आघाम, तुलसी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा पूजा वाघमारे, बाळासाहेब वाजोळकर, ग्रा.प सदस्य जयभीम रंधे, ज्ञानदेव गवळी,बाळासाहेब तौर, केंधळी प्रभागातील सर्व कॅडर उपस्थित होते.

महिला बचत गटांना उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने प्रशिक्षण आयोजित करून त्यांना प्रशिक्षित करून उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले तसेच तुलसी महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत महिलाना उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते उपजीविका वाढविण्यासाठी तीन लक्ष रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.प्रभागसंघ व्यवस्थापिका सुषमा ढाकरगे यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा दिला तर ग्रामसंघ लिपिक वैशाली शहाणे यांनी प्रभागाच्या वतीने ९० गटांना उपजीविका कर्ज वितरित केलेले सांगितले

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता चौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा बोराडे यांनी मानले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→13 ऑगस्ट 2022
मंठा शहरात अभाविपच्यावतिने तिरंगा ध्वज पदयात्रा संपन्न,५०१ फुट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज

मंठा शहरात अभाविपच्यावतिने तिरंगा ध्वज पदयात्रा संपन्न,५०१ फुट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात