📰 ताज्या घडामोडी

समर्थ रामदास स्वामींच्या जन्म गावातून चोरीस गेलेल्या ऐतिहासिक राम सीता लक्ष्मणाच्या मूर्ती चोरणारास तात्काळ अटक करा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,आमदार लोणीकर यांनी भ्रमणध्वनी वरून पोलीस निरीक्षक व मंदिराचे पुजारी धनंजय कुलकर्णी यांच्याशी संवाद साधत घटने संदर्भात पोलीस निरीक्षक यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले निर्देश

Shamsundar chittoda
22 ऑगस्ट 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

इ स पंधराशे साली समर्थ रामदास स्वामींच्या जांब समर्थ गावामध्ये स्थापित करण्यात आलेल्या राम सीता लक्ष्मणाच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती दिनांक 21 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्या या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्र देत या ऐतिहासिक मुर्त्यांच्या चोरी संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून संबंधित चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे

याबाबतचे अधिकृत असे की जांब समर्थ तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील मूर्ती चोरीची घटना समजताच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलत चोरांना जेरबंद करावे असे सांगितले त्याचबरोबर मंदिराचे पुजारी धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करत घडलेल्या घटने संदर्भात इतिवृत्तांत जाणून घेतला

समर्थ रामदास स्वामी हे अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रगण्य असलेले संत असून त्यांच्या गावातील इ स 1500 मध्ये स्थापित केलेल्या मूर्ती चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे राज्यभरातून व जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकातून संताप व्यक्त केला जात असून यासंदर्भामध्ये तात्काळ कारवाई होणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे

ज्या रामदास स्वामींनी महाराष्ट्र राज्यातील गावा गावामध्ये श्री हनुमानाचे मंदिर स्थापित केले अशा महान विभूतीच्या गावातील मंदिरामध्ये असलेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती चोरी जाणे ही गोष्ट अतिशय वेदनादायक असून या घटनेमुळे सर्वत्र चोरट्यांच्या विरोधामध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात