📰 ताज्या घडामोडी

मंठा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कलेच्या माध्यमातून साजरा

च
Shamsundar chittoda
15 ऑगस्ट 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

दि.१५ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबडा व बरबडा वसाहत केंद्र केंधळी ता. मंठा जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त कलेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास एकदिवसीय शिबिराचे आयोजन केल्याप्रसंगी या शिबिरास मार्गदर्शन प्रमुख वक्ते सतीश पाटील खरात लिंबेवडगावकर ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव प्रसंगी सतीश खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, कला ही जीवन जगण्याची, आनंददायी, शैक्षणिक वैज्ञानिक ज्ञान, सामाजिक ज्ञान, सर्व बाबींनी बहु आयामी असे कलाशिक्षणातून विद्यार्थ्यांनी घडावे.

शाळेतील गुरुजींनी शिकवलेल्या शिक्षणातून विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणाची शिदोरी घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी. राष्ट्रभावना, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम सदैव जागृत ठेवून देशाची सेवा करावी. सतीश खरात यांनी आपल्या कलेतून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून विविध अंगी नाट्यछटाद्वारे आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र कलाक्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्राविषयी सविस्तर माहितीचा उलगडा करून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले पाहिजे. स्वातंत्र्य भारताचा हा अमृत महोत्सव आपण आनंदाने उत्स्फूर्तपणे साजरा करत आहोत. असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात प्रसंगी गावातील बाळासाहेब हजारे सरपंच, द्वारकादास चिंचाने उपसरपंच विजय भुतेकर ग्रामसेवक, शिवाजी हजारे शा. व्य. स. अध्यक्ष,व राजेश हजारे शा. व्य. स. अध्यक्ष, चिंतामण गाडेकर,नबाजी वटाणे, रावसाहेब वटाणे,बबन वटाणे, प्रकाश हजारे,गोपाळ कडूकर,संतोष हजारे,माऊली हजारे,शिवाजी हजारे, गजानन वायाळ मु अ.नामदेव चव्हाळ मु अ. स्वाती बनसोडे, मोहन तुरुकमाने आदींची उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 ऑगस्ट 2022
माय नेशन माय प्राइड लायंस क्लब ऑफ़ जालना डायमंड तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

माय नेशन माय प्राइड लायंस क्लब ऑफ़ जालना डायमंड तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात