📰 ताज्या घडामोडी

खरपुडी बनते तालुक्यातील विकासाचे रोल मॉडेल, दूरदृष्टी : विविध मार्गाने ग्रामपंचायतीने खेचून आणला विकास निधी

Shamsundar chittoda
31 ऑगस्ट 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तालुक्यातील शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खरपुडी गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच कविता अरुण गिरी यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध मार्गाने विकास कामासाठी निधी खेचून आणला आणि गावांमध्ये विकास कामाचा धडाका लावला आज गावाचा चेहरा मोहरा बदलत आहे तालुक्यातील खरपुडी हे गाव विकासाचे रोल मॉडेल बनत आहे

जालना तालुक्यातील खरपुडी गावाच्या विकास कामासाठी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची अरुण गिरी यांनी अलीकडेच भेट घेतली जवळपास 45 लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला मयूर फोटो

जवळपास साडेतीन हजार लोकसंख्येचे असलेले हे गाव या ठिकाणी आनंदाने असणारे विविध जाती धर्माचे लोक सातत्याने विकास कामाला सहकार्य करत असून शासन प्रशासन स्तरावरून या गावाला होणारी मदत यामुळे गावाचा कायापालट होताना दिसत आहे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी तसेच विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी आर.बी. कोथलकर उपसरपंच भरत शेजुळ तसेच माजी पंचायत समिती सभापती समाधान शेजुळ ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक या सर्वांनी सरपंच कविता अरुण गिरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ग्रामविकासाला दिलेली साथ महत्त्वाची ठरली गावामध्ये आज घडीला समशानभूमीचे सुशोभीकरण तसेच गावामध्ये ओला कचरा सुका कचरा याचे व्यवस्थापन सर्वांना पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था गावामध्ये असलेल्या चर्च या प्रार्थनास्थळासमोर पेवर ब्लॉक बसवून वृक्षारोपणाचे काम तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण तसेच पेवर ब्लॉक बसवून हाय मॅक्स विद्युतीकरण गावातील रस्त्याचे काम ही सर्व कामे जोमाने सुरू असून अवघ्या महिनाभरामध्ये सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास अरुण गिरी यांनी दिला एवढेच नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदत असलेल्या सर्व जाती धर्मातील जनतेसाठी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे विकास निधी मंजूर करून आणला अलीकडेच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची आपण भेट घेतली असून त्यांनी गाव विकासासाठी 45 लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे यामधून आरोग्य शिक्षण तसेच महिला सक्षमीकरण गाव सुशोभीकरण यासह खरपुडी गावाला सर्व नागरी सुविधा पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न असून लवकरात लवकर ही कामे पूर्ण होतील असा विश्वास अरुण गिरी यांनी व्यक्त केला तालुक्यामध्ये खरपुडी हे गाव नक्कीच विकासाचे रोल मॉडेल ठरेल हे तितकेच खरे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात