📰 ताज्या घडामोडी

मंठा तालुक्यात गरोदर माता व चिमुकल्या बालकांचा पोषण आहाराचा घास गायब ?

च
Shamsundar chittoda
29 जुलै 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ

दि. २८ महाराष्ट्र शासन गरोदर, स्तनदा माता व बालक तंदुरुस्त राहावे यादृष्टीने विविध योजना राबवित असते.

त्यामध्ये गरोदर माता व बालक यांना बालविकास प्रकल्प अंतर्गत त्यांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी त्यांना सकस आहार पुरविण्याचे काम या विभागामार्फत चालत असते. परंतु हा विभागच जर गरोदर,स्तनदा माता व चिमुकले बालक यांच्या घशात जाणारा सकस पोषण आहार संबंधित विभागाच्या खिशात जातो की काय हा प्रश्न उपस्थित होतो ? यामध्ये संबंधित लाभार्थ्यांना दोन-तीन वेळा जाऊनही आहार वाटप केला जात नाही. व त्यानंतर लाभार्थी कंटाळून तिकडे जाणे सोडून देतो. कालांतराने नंतर लाभार्थी दुसऱ्या वेळेस गेल्यास मागील आहाराची चौकशी केली असता. मागील वेळेस पोषण आहार आला नाही, कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जमा करून घेतला, असे अनेक नाना प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. तसेच पोषण आहार वाटपाचे दोन ते तीन दिवसच ठेवले जातात एखाद्यावेळेस लाभार्थी हा त्या दोन दिवसांमध्ये गेला नाही तर त्याचा आलेला पोषण आहार त्यानंतर त्याला दिला जात नाही. आलेला पोषण आहार संपला असे सांगितले जाते. तसेच अनेक करणे सांगून आर्थिक निधी जमा करतात. व अनेक वेळा वेगवेगळ्या वस्तू यांच्या मार्फत विक्री केल्या जातात. त्यावर संबंधित विभागाला कमिशन दिले जाते का ? हा प्रश्न उपस्थित होतो.पोषण आहार लाभार्थी यांना अनिवार्य करून खरेदी करण्यास भाग पाडले जाते.यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर मिलीभगत नाही ना हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. तरी जिल्हा अधिकारी साहेब यांनी वेळीच दखल घेऊन न्याय देवा व सामान्य नागरिक या सर्व प्रकाराला कंटाळलेला आहे परंतु तक्रार करण्यास कोणी पुढे धजावत नाही याची कारणे अनेक आहेत. त्यांना भीती आहे की, या विभागामार्फत लसीकरण केले जाते आणि लसीकरणाची माहिती आपल्याला दिली नाही तर त्या आहारापेक्षा लसीकरण महत्त्वाचे समजून कुणी तक्रार करण्यासही तयार होत नाही. आणि या गोष्टीचा फायदा हा संबंधित विभाग वारंवार घेत आहे. तरी संबंधित वरीष्ठ विभागाने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी. अशी नागरिकांतून मागणी होत आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी मंठा आर.एस.कोळेकर यांना या संबंधित माहिती विचारण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→27 जुलै 2022
मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांना मातृशोक

मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांना मातृशोक

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात