📰 ताज्या घडामोडी

बँकेच्या आर्थिक साहयातुन महिलांनी आर्थिक विकास साधावा स्टेट बँकेच्या वतीने २९ महिला बचत गटांना ७९ लाख रुपये कर्ज वितरण

Shamsundar chittoda
4 जुलै 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

महिलांनी मिळणार्‍या बचत गटाच्या कर्ज अर्थसाह्यतून आर्थिक नियोजन करून आपल्या कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांनी केले. ते स्टेट बँकेच्या वर्धापन दिनी महिला बचत गटांना पंचायत समिति कार्यालयात २९ गटांना ७९ लाख रुपये कर्ज वाटप मेळाव्या प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे कृषी अधिकारी रविंद्र डांगे, संदीप दाभाडे, भानूदास शिंदे, शेळके, ओम खरात, यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी म्हणाले महिलांनी व्यवसाय वाढीसाठी प्रशिक्षण घेऊन शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून फायदा घ्यावा. त्यासाठी बँक आर्थिक सहकार्य करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. त्यासाठी महिला बचत गटांनी आपली पत निर्माण करणे गरजेचे आहे. समूह ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या माध्यमातून वंचित महिलाना गटात सामील करून घेण्याचे आवाहन केले. महिला समुहामुळे महिलांचा समाजात आत्मविश्वास वाढतो. समूह हा संघटितपणा शिकवतो. गटांनी व्यवसाय करतांना वेगवेगळ्या व्यवसायाची निवड करून व्यवसाय वाढवून आर्थिक विकास साधावा व आर्थिक सक्षम व्हावे. तसेच आजचा बँकेच्या डिजीटल व्यवहाराच्या काळात महिलांनी बँकेच्या ग्रीन कार्ड वापर करून वेळेचा व पेपरलेस सुविधेचा लाभ घ्यावा. असे वाहन शेवटी सावजी यांनी केले आहे.

सीबीलमुळे भावी पिढीचे कर्जाचे दारे बंद

सध्या बँककडून कोणत्याही प्रकारचा कर्ज पुरवठा करतांना सीबील विचारात घेतले जात आहे. ज्या नागरिकांचे व्यवहार चांगले असतील. किंवा ज्याची पत चांगली आहे. कुठलेही कर्ज थकलेले नाही. अश्या ग्राहकांना बँक कर्ज देते. यामध्ये कुठे सीबील खराब झाल्यास आपल्यासह भावी पिढीला कर्जाचे दारे बंद असल्याने घेतलेले कर्ज फेडावे. तसेच कुणाचे जामीनदार होतांना काळजी घ्यावी.*

अतुल सावजी, (मुख्य शाखा व्यवस्थापक)

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात