📰 ताज्या घडामोडी

देवर्षी संगीत विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती गीतांच्या कार्यक्रम संपन्न

च
Shamsundar chittoda
16 जुलै 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनिधी हनुमंत दवंडे

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त परतूर शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे विठ्ठल आवडी प्रेमभाव हा अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला. देवर्षी संगीत विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्राध्यापक रामेश्वर नरवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष होते. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस अशा भक्तीगीताचे आणि सुप्रसिद्ध अभंगाचे सादरीकरण केले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रामेश्वर अण्णा नळगे उद्घाटक कपिल आकात सभापती कृउबा समिती ज्ञानेश्वर काळे संस्थापक अध्यक्ष अर्बन बँक प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे, जेष्ठ नगरसेवक अंकुश तेलगड, विनायकराव काळे, विजय राखे, बाबासाहेब तेलगड, गटसमन्वक कल्याण बागल, प्राचार्य शंकरराव चव्हाळ, लायन्स क्लबचे मनोहरराव खालापुरे, शाम तेलगड, माजी सैनिक प्रशांत पुरी, जिजाऊ ब्रिगेड च्या अर्चना तनपुरे, सौ, वर्षा पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अभंगवाणी कार्यक्रमाचे प्रायोजक युवा नेते महेश नळगे, विशाल पवार, आकर्षण फुटवेअरचे विनोद जईद, पाटील पेंट्स चे संदीप पाटील, डॉ. दीपक दिरंगे, नगरसेवक, प्रकाश चव्हाण, बाबासाहेब लहाने उपस्थित होते.

सुरुवातीला आरुष बहीवाल, अन्वी चव्हाळ, पार्थ रायमुळे, समृद्धी खैरे, साईराज डव्हारे या बाल कलाकारांनी शारदा स्तवन आणि प्रार्थनेने मान्यवर मंडळींची मने जिंकून घेतली.

तद्नंतर अमृता नरवडे हिने या पंढरपूरात काय वाजत गाजत, हर्षिता मुंडदा हिने जगी जीवनाचे सार, करुणा मालपाणी च्या कानडा राजा पंढरीचा, पंढरीचा विठ्ठल कुणी पहिला हे भक्तीगीत उदय पारीक,यश काकडे,तेजस लोमटे या तिघांनी सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.

संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत निळोबाराया आदि संतांनी वर्णन केलेल्या अभंगावर इतर विद्यार्थ्यांनी आपली गायन सेवा प्रस्तुत केली, त्यामध्ये

दिपाली कुलकर्णी चा बोलवा विठल, वैष्णवी वाकडे चा अवघे गरजे पंढरपूर,सौ.शारदा राजबिंडे यांचा झणी दृष्टि लागो, सौ.ज्योती खैरे यांचा पाऊले चालती पंढरीचि वाट तसेच सानिका आष्टेकर, विष्णु भांबरगे, मनोज वंजारे, यांच्या अर्थपूर्ण अभंगांनी कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. वादक साथीदार म्हणून माऊली भांबरगे, व्यंकटेश व्यास, विष्णु पावले यांनी काम बघितल. सूत्र संचालन सौ.लंका भवर आणि सौ. आकांक्षा नरवडे यांनी केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 जुलै 2022
शेतकर्‍या साठी नेहमी झटणारे आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्या- अरुण खराबे पाटील.

शेतकर्‍या साठी नेहमी झटणारे आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्या- अरुण खराबे पाटील.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात