📰 ताज्या घडामोडी

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

च
Shamsundar chittoda
10 जुलै 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल तर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे त्यातील वारीची ही परंपरा तसेच संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावे व वारीचा प्रत्यक्ष अनुभव यावा आणि आपल्या देशाची संस्कृती जपावी याकरिता या दिंडी सोहळ्याचे शाळा ते शहरातील विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये मुले व मुली विठ्ठल रुक्मिणी महाराष्ट्रात विविध संत यांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते . दिंडीत विद्यार्थ्यांनी झेंडे, पताके हातात घेऊन विठूरायाच्या गजर करत पालखी काढली होती. सदर सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या व बेटी बचाव , बेटी पढाव ,झाडे लावा, झाडे वाचवा, पाणी हेच जीवन अशा प्रकारचे वेगवेगळे संदेश दिले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पालखीचे पूजन केले. सदरील दिंडी सोहळामध्ये शाळेचे संचालक श्री संतोष चव्हाण ,सुबोध चव्हाण, सचिन चव्हाण ,भाग्यश्री चव्हाण , सर्व शिक्षक, पालक, शहरातील नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते .सदरील सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य गजानन कास्तोडे, वंदना ककाक्रिये, मीनाक्षी शिंगारे, राखी मुंदडा, अरुणा दीक्षित, संजय कपाळे, मनीषा लहाने, नूतन नलावडे इत्यादींनी परिश्रम घेतले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→8 जुलै 2022
गुणवंतांनी प्रगतीचे शिखर गाठावे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर ,यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम करणे गरजे आपल्यातील गुणांचा उपयोग समाजासाठी व्हावा,*परतूर येथे युवा मोर्चाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार संपन्न*

गुणवंतांनी प्रगतीचे शिखर गाठावे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर ,यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम करणे गरजे आपल्यातील गुणांचा उपयोग समाजासाठी व्हावा,*परतूर येथे युवा मोर्चाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार संपन्न*

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात