📰 ताज्या घडामोडी

पोलीस उपनिरीक्षक पदी केदार गरड यांची नियुक्ती झाल्याबद्दल वाढोणा येथे सत्कार..

Shamsundar chittoda
11 जून 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर तालुक्यातील वाढोणा येथे केदार गरड यांची पोलीस उपनिरीक्षक(psi) पदी नियुक्ती झाल्याबद्दल एका घरगुती कार्यक्रमात त्यांचा पुष्पगुच्छ व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. केदार गरड हे मूळचे सूर्डी ता. माजलगाव जि. बीड येथे वास्तव्यास

आहेत.एमपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि एमपीएससी परिक्षेमधून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी नियुक्ती झाली आहे .केदार गरड याने अत्यंत मेहनतीने व जिद्दीच्या बळावरती एमपीएससी परीक्षा मध्ये घवघवीत असे यश संपादन केले आहे. कारण की त्याने यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे कुठलाही कोचिंग क्लास न लावता स्वतःच्या मनगटाच्या बळावरती आणि बुद्धीच्या जोरावरती एमपीएससी परीक्षे मधून मी पीएसआय होणारच ही खुणगाठ मनाशी बांधलेली होती. एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असताना अनेक संकट आली त्या संकटाला मी एक चान्स मानून सामोरे गेलो असे केदार गरड याने सांगितले . माझ्या पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच मला अनेक नातेवाईकांनी फोन करून शुभेच्छा दिल्या तसेच मित्रपरिवार यांनी माझे अभिनंदन केले आहे. असे त्यांनी सत्कार समारंभ प्रसंगी आपली भावना व्यक्त केली आहे .या सत्कार सोहळ्याला उपस्थित म्हणून. प्रा. पांडुरंग नवल, सोमेश्वर घारे, सभापती रामेश्वर तनपुरे ,नवनाथ तनपुरे, अशोकराव तनपुरे, कैलास शेळके, भिसे नाना ,सरपंच सुरेशराव शेळके ,भास्कराव तनपुरे ,गोविंद जाधव, प्रभाकर जाधव उपसरपंच शिरसगाव, विश्वंभर आबा ,आणि गावातील इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मान्यवरांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात