📰 ताज्या घडामोडी

पॅसेंजर तसेच लोकल रेल्वे गाड्यांचे ग्रामीण स्टेशनचे थांबे पूर्ववत करा.....लालबावटा

च
Shamsundar chittoda
29 जून 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

कोरोणाच्या नंतर नांदेड विभागातील पूर्ववत चालू असलेल्या रेल्वेगाड्या काही बंद तर काहींना एक्सप्रेस केले आहे

त्यामुळे ग्रामीण स्टेशन वरील थांबे बंद झाले आहेत तसेच गाड्या एक्सप्रेस केल्यामुळे त्यांचे तिकिटाचे दर वाढले आहेत त्यामुळे सामान्य प्रवाशांना जालना औरंगाबाद कडे किंवा परभणीकडे जावयाचे असल्यास त्यांना परतुर किंवा सेलू सारख्या स्टेशन कडे खाजगी वाहनाने यावे लागते मगच प्रवास करता येतो त्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे कोरोणाच्या महामारी नंतर रेल्वे विभागाने जनतेला सेवा देणे अपेक्षित होते परंतु रेल्वेने या गाड्यांचे थांबे बंद करून व तिकीट दरात वाढ करून त्यांच्यावर अन्यायच केला आहे तसेच ग्रामीण गरीब जनतेला रीझर्वेशन करता येत नसल्यामुळे त्यांना अत्यंत मानसिक त्रास होत आहे. हैदराबाद- औरंगाबाद, निजामाबाद-पुणे,मन माड-काचिगुडा या पॅसेंजर गाड्या पूर्ववत करून सातोना खुर्द, उस्मानपुर, पारडगाव, कोडी,सारवाडी, येथे थांबा देऊन ग्रामीण विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर,कामगार यांना सहकार्य करावे गंभीर आजार, गरोदर महिला, लहान मुले असलेल्या महिलांना मोफत सुविधा सुरू कराव्यात, विद्यार्थी व वृद्ध यांना प्रवास मोफत करावा, रेल्वे मधील रोजगाराचे कंत्राटीकरण बंद करावे, रेल्वे मधील कंत्राटी कामगारांना कायम करावे अशा विविध मागण्याचे निवेदन लाल बावटा चे महाराष्ट्र अध्यक्ष कॉम्रेड मारुती खंदारे व जालना जिल्हा अध्यक्षा सरिता खंदारे यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रवाशांच्या व मजूरांच्या उपस्थितीत सातोना खुर्द रेल्वे स्टेशनचे स्टेशन अधीक्षक कौशल कुमार यादव यांना देण्यात आले या निवेदनावर कॉम्रेड रवी भदर्गे, भगवान काळे, स.अमेर, शेख अफ्रिज, सीता अकात, रामा वाव्हळ, मनीषा वाव्हळ यांच्या सह्या आहेत यावेळी रेल्वेचा व परतूर पोलिस स्टेशनचा प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त उपस्थित होता या बंदोबस्तासाठी जालनाचे रेल्वे इंस्पेक्टर नरनाराम,यम् राजमल्लू,राजेश उबाळे, रेल्वे गुप्तचर विभागाचे शेख अजीज अहेमद, साहेबराव कांबळे, दिलीप लोणारे विजय बोराडे, राहुल गायकवाड,कैलास वाघ, सोनाली मुंडे,पांडुरंग चव्हाण तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचे एपीआय सचिन पुंडगे,नितीन कोकणे, संजय वैद्य,आबासाहेब बनसोडे व महिला पोलिस कॉन्स्टेबल संगीतम आणि उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→29 जून 2022
नदीवर तात्काळ पुल बांधा' अन्यथा पाण्यात आंदोलन

नदीवर तात्काळ पुल बांधा' अन्यथा पाण्यात आंदोलन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात