📰 ताज्या घडामोडी

आपला मुलगा मुलगी अधिकारी झाले पाहिजे यासाठी आई वडीलांने पुढे येऊन पुढाकार घ्यावा-खानाळ साहेब ( पोलीस निरीक्षक गुन्हा शाखा अधिकारी उस्मानाबाद)

Shamsundar chittoda
13 जून 2022⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव बीड येथे मा प्रकाश सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली ना नेता ना पक्ष सर्व धनगर समाज एकत्र हेच लक्ष या विचारांना समाजाने दिला मोठा प्रतिसाद या जन्मोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष खानाळ साहेब , स्वागत अध्यक्ष प्रकाश सोनसळे प्रमुख पाहुणे, हनुमंत राव काळे कृषी अधिकारी, विकास कोरडे साहेब नायब तहसीलदार बीड ,शरद माळशिकारे तुरुंग अधिकारी बीड, सुंदरराव काकडे मंडलाधिकारी बीड,महादेव हजारे ग्रामसेवक, डॉ हनुमंत पारखे ,अर्जुन मासाळ सर, व,पोलीस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी,कृषीअधिकारी, महावितरण अधिकारी, ग्रामसेवक, परिवहन अधिकारी, युवा उद्योजक, मेंढपाळ बांधव यांच्या उपस्थितीत बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा येथे माता-भगिनी पत्रकार बांधव व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमास संबोधित करताना खानाळ साहेब (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद) यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपला विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्याला चांगलं घडवलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे वेळोवेळी आपण विद्यार्थ्याला मार्गदर्शन करून शिक्षणासाठी शहरांमध्ये आणून क्लासेस लावून आपला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन आपला विद्यार्थी घडला पाहिजे जर आज आपला एक अधिकारी झाला तर नक्कीच तो अधिकारी अनेक अधिकारी घडू शकतो असे खानाळ साहेब यांनी बोलताना सांगितले.

आपण अहिल्यादेवी होळकरांचे वारसदार आहोत अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जागा करण्यासाठी आपण गावोगावी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव साजरा करून अहिल्यादेवी होळकरांचे कार्य देशभरामध्ये आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्यात यावे यासाठी सर्व समाज बांधवांनी जागृत झाले पाहिजे ज्यांची जन्मभूमी (चोंडी अहमदनगर) आहे व त्यांची कर्मभूमी हे भारत देशभर आहे अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्यात यावे अशी लवकरच मागणी माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन करून अखंड महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज यांच्या वतीने देण्यात येणार आहे तरी आपण या निवेदना करता आपली उपस्थिती आपला हक्क आपली मागणी यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे असे स्वागत अध्यक्ष प्रकाश सोनसळे धनगर समाज अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी या जन्मोत्सव कार्यक्रमास संबोधित करताना म्हटले आहे.

या कार्यक्रमास विशेष गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झाली असे ज्ञानेश्वर देवकते यांचा सर्व प्रमुख उपस्थित यांच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये ज्यांनी १४ व्या वर्षी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर गीत गायन केले असे अर्जुन महानोर यांचा सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास पंचक्रोशीतील खेड्यातील वाडी-वस्ती तांड्यावरून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती बीड जिल्हा अध्यक्ष शीतल मतकर, उपाध्यक्ष भारत गाडे, बाळासाहेब गावडे, ज्ञानेश्वर ढोरमारे, पवन गावडे, विकास सोनसळे, हनुमंत राहिंज, राहुल ठेंगल, विशाल प्रभाळे, विजय घोंगडे, सोपानराव गावडे सरपंच, नारायण भोंडवे सरपंच ,रवी गाडेकर सरपंच, सखाराम गोरे सरपंच, भागवत गावडे, भाऊसाहेब सोनसळे, अशोक पांढरे, बापू प्रभाळे, माऊली मार्कड ,शरद मार्कड , आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल शेळके सर यांनी केले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात