📰 ताज्या घडामोडी

वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील – पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे

Shamsundar chittoda
24 मे 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रशासन नेहमी प्रयत्नशील आहे. पोलिस प्रशासन काम करीत असतांना वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी केले.

येथील आष्टी रेल्वेगेट जवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्धभवत आहे. येथे उड्डाण पुलाचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक आहे. एका बाजूचा रस्ता बंद असल्याने रेल्वेगेट जवळ वळण रस्ता आहे. दोन वाहने एकाच वेळी वळत नसल्याने वाहतूक कोंडीस अडथळा निर्माण होत आहे. येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली आहे. रेल्वेगेट बंद झाल्यास काही काळ वाहतूक थांबत असल्याने वाहनाच्या रांगा लागत असल्याने वाहन चालक वाहने बाहेर काढण्यास घाई करून कधी अडथळा होण्यास करणीभूत ठरत आहे. पोलिस अश्या वाहनावर कारवाई केली. काहींना समज दिली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरुळीत करण्यासाठी प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठक घेतल्या मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस प्रशासन हे जबाबदारी घेत स्वत रेल्वेगेट वरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन जातीने लक्ष घालून वाहतूक वर्दळ जास्त असल्याच्या दिवशी स्वत उभा राहून वाहतूक सुरळीत करून शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी पोलिसांना नागरिकांचे वाहन चालकांचे तितकेच सहकार्य महत्वाचे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात