📰 ताज्या घडामोडी

नशा मुक्तीचे उपचार करूनही नशा मुक्त होईना,रुग्णालयावर कारवाई करण्याची रुग्णाच्या कुटुंबियांची मागणी

Shamsundar chittoda
16 मे 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

दारूच्या नशेच्या आहारी गेलेले त्यातून बाहेर पडत नसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला समाजात मिळत आहेत. दारू पिण्याची सवयी असलेल्या घरातील व्यक्तिला अनेक वेळा समज देऊनही दारू सुटत नसल्याने उपचारा मार्ग अवलंबला मात्र लाखो रुपये खर्च करूनही हाती निराशा पडल्याने नाशिक येथील नेर्लिकर रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी परतूर येथील महिलांनी नाशिक येथील महानगर पालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाशिक शहरातील नेर्लीकर हॉस्पिटल मध्ये नशामुक्त करण्यासाठी पूर्ण खात्री देऊन गेल्या एक दीड वर्षापूर्वी उपचार केले. त्यांनंतर नियमित औषध गोळ्या घेतल्या. उपचारासाठी लागणार्‍या खर्च करण्यासाठी घराची परिस्थिति हालाखीची असल्याने व्याजाने, दाग दागिने, शेती विकून उपचासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र नशामुक्तीचे उपचार करूनही दारूची सवयी सुटली नसल्याने नियमित दारू पित असल्याने नातेवाईक हे डॉक्टरांना चौकशी करण्यासाठी गेले असता नशामुक्त करण्याची हमी देत नसल्याचे उत्तर देऊन तुम्हाला काय करायचे तर करा आम्ही आरोग्य अधिकारी यांना हाताशी धरून काम करतो आमचे कोणी काही करू शकत नाही. असे म्हणून सांगून उडवाउडवी केली. यामुळे नातेवाईक हादरून गेले. उपचासाठी केलेला लाखो रुपये खर्च वायफळ गेल्याने दारू सुटली नसल्याने कुटुंब हताश झाले आहे. हाती निराशा पडल्याने सबंधित रुग्णालयाने नशामुक्तिच्या नावाखाली पैसे उकळून फसवणूक केल्याची तक्रार नाशिक शहर महानगर पालिकाचे आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक नाशिक, पोलिस ठाणे नाशिक गांगपूर रोडकडे यांच्याकडे तक्रार करून रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

याबाबत नेर्लीकर रुग्णालयातील डॉक्टर यांना प्रतिक्रिया देण्यास विचारले असता वरिष्ठ डॉक्टरांना भेटण्यास सांगीतले. वरिष्ठ डॉक्टर यांची येण्यास काही वेळ वाट लागेल सांगण्यात आले. मात्र काही वेळाने पुन्हा रुग्णालयाशी भेट दिली असता डॉक्टर रुग्णालयात आले नसल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातून दोन्ही डॉक्टर गायब झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

परतूर तालुक्यात अनेक जणांनी नाशिक येथे दारू सोडण्यासाठी उपचार केले. उपचार करून आल्यावर अनेकांनी काही महीने दारू सोडली मात्र उपचार करतांना कायमची दारू सुटेल असे सांगितले असतांना मात्र अनेकांना पुन्हा दारूचे व्यसन जडल्याने खर्च करून पैसे वायफळ गेल्याने अनेकांचे संसार दारू पायी उद्ध्वस्त झाले आहे

राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असतांना यांच्या जिल्हातील रुग्णाच्या नातेवाइकांनी नाशिक येथील हॉस्पिटलने नसामुक्त करण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याची तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली असताना यावर रुग्णालयावर काय कारवाई होते लक्ष लागले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात