📰 ताज्या घडामोडी

येणार्‍या पालिका निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार – ऐ जे बोराडे

Shamsundar chittoda
10 एप्रिल 2022⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

येणाऱ्या काळात पालिका निवडणुकासाठी पक्ष प्रमुखाकडून कोणत्याच पक्षाची युती केली जाणार नसल्याचे भूमिका त्यांनी जिल्हाप्रमुखाच्या बैठकीत घेतली असल्याने येणार्‍या पालिका निवडणुकीत शिवसेना कोणत्याच पक्षाची युती करणार नसून स्वबळावर लढणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी दिली ते परतूर येथे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे परतूर तालुकाप्रमुख अशोक आघाव, मंठ्याचे अजय अवचार, सुर्दशन सोळंके, दत्ता सुरूग, विदुर जईद, भगवान सुरूंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना बोराडे म्हणाले की शिवसेनेच्या व आघाडी सरकारच्या माध्यमातून रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून परतूर तालुक्यासाठी दहा कोटी रुपये निधि आणून पाणंद रस्त्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात रस्त्याचा कामातून विकास होणार आहे. शहाराच्या विकासासाठी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, विनोद घोसाळकर, यांच्याकडे मागणी करून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा प्रमुख ऐजे बोराडे, मोहन अग्रवाल, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, बाबासाहेब तेलगड, यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून नगरविकास मंत्री यांच्याकडून शहराला चार कोटी निधी मिळाला आहे. लवकर विकास कामांना सुरुवात होईल.

शिवसेना आघाडी सरकार विकास करीत असल्याने सध्या आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाकडून सूडाचे राजकारण केले जात आहे. खालच्या पातळीवर राजकारण करून धाडसत्र सुरू केले. मात्र शिवसेना घाबरणार नाही. सेनेची बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. शिवसेनाच चेहरा हे खासदार संजय राऊत चुकीचं करणार नाही. कितीही बदनामी केली तर काही फरक पडणार नाही. काहीच परिणाम होणार नाही. संधी सर्वांना आहे. भाजपाचे नेत्यांची सगळी माहिती काढून यांची माहिती काढू अगोदर काय होत आणि आता किती मालमत्ता आहे हे सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्र काय चाललं हे लोकांना कळत आहे. भाजपचा डाव कधीही शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही.

शिवसेनेत निवडणुकीत कोनतेहि गटबाजी होऊ देणार नाही. एकत्र बसून निर्णय घेऊ निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरू. शहर व ग्रामीण भागात सध्या १४ कोटी निधी मिळाला आहे. निवडणुकीत त्यांचे फळ मिळेल शिवसेनेत गटबाजी करण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आता परिवर्तन होईल.

ऐकेकाळी दारीद्ररेषेच्या यादीत असलेले काही नेते काही वर्षातचं करोडपती झाले कसे हे सोडुन भाजपा ईडीचा दाखवुन महाअघाडीच्या नेत्यांनाचं विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऐ.जे.बोराडे यांनी केला.

राज्यातील महाअघाडी सरकार सक्षमपणे आपले काम करत असुन समान विकासधोरणाप्रमाणे प्रत्येक मतदारसंघात विकास कामांसाठी करोडो रूपयाचे पॅकेज अघाडीतील मंत्री देत आहेत. यामुळे नागरीकांना मिळत असलेल्या सुविधेबाबत सर्वमामान्य समाधान व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले.

येणाऱ्या जिल्हा परिषद, नगर पालीका निवडणुकीत शिवसेनेने ऐकला चलो रे ची भुमिका घेतली असुन कार्यकर्त्यांनाही पदाच्या माध्यमातुन न्याय मिळावा. तसेच गावागावात शिवसेना पक्षाच्या चळचळीला वेग मिळावा या दृश्टीने शकतो निवडणुकीत शिवसेना कुणाचीही साथ न घेता निवडणुक रिंगणात उतरणार असल्याची त्यांनी माहिती दिली. भाजपाला राज्यात सत्तेवरूण खाली खेचण्यात शिवसेना नेते संजय राउत यांचे मोठी भुमिका आहे. हीच खदखद भाजपाला सतावते व भाजपाच्या अन्यायी धोरणा विरुद्ध महाअघाडीचे नेते मंत्री सडाडुन रोखठोक बोलत असल्यानेचं केद्रातील सत्तेच्या ताकतीचा गेरफायदा घेत भाजपा ईडीच्या आडुन महाअघाडीच्या सुरळीत चाललेला कारभारात व्यत्यय आनण्याचा पर्यन्त करत असल्याचे शेवटी ते म्हणाले. त्यांचे मनसुबे उधळत महाअघाडी हे पाच वर्ष कारभार सुरळीत चालवतील. ईडी धाक आम्हालाचं का असे म्हणत भाजपा का धुतल्या तादंळांचा आहे का असा सवाल बोराडे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी अमोल सुरुंग, संदीप पाचारे, भारत भुसारे, रामजी खवल, सखाराम इंगळे, बाळू गाते, विजय ठोंबरे, दीपक हिवाळे, बबा सोळंके, हे उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात