📰 ताज्या घडामोडी

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मध्ये होणाऱ्या सभेला परवानगी न देण्याची मागणी., परवानगी दिल्यास आत्मदहन करणार मंठा येथे नागरिकांनी दिले निवेदन.

Shamsundar chittoda
27 एप्रिल 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा - सुभाष वायाळ

दि.२७ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न देण्याची मागणी मंठा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले की सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सत्तेच्या स्वार्थासाठी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे.जातीवादी चे राजकारण करीत आहे.व शांत महाराष्ट्र राज्याला

पेटविण्याचे काम करीत आहे. मुंबई येथिल सभेत त्यांनी मुस्लिम समाजाच्या मस्जिद वरील भोंग्याबबात व अजान बाबत नवा वाद निर्माण करुन सभेत प्रक्षोभक भाषण करुन हिंदु मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.व समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या आहे. राज ठाकरे भर सभेत मुस्लीम समाजाच्या विरोधात चेतावनी खोर भाषण खुले आम करीत आहे. व पवित्र अजानच्या विरोधात मस्जिदीसमोर भोंगे लावुन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याची धमकी देत

आहे.त्यामुळे हिंदु मुस्लीम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करुन महाराष्ट्रात हिंदु

मुस्लीम समाजामध्ये जातीय दंगल लावण्याचे काम करीत आहे.तरीही महाराष्ट सरकार कडुन व महाराष्ट्र पोलीसा कडुन राज ठाकरे वर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.असे का? तर 1 में रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न द्यावी नसता मराठवाडा व महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल,

परवानगि दिल्यास पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथेआत्मदहन करण्याचा इशारा शेवटी निवेदनात देण्यात आला आहे

निवेदनावर सय्यद रफिक, मोसीन कुरेशी,प्रदीप मोरे,एजाज भाई, लखन कांबळे, लायक कुरेशी,बंडू बोराडे, मुस्ताक कुरेशी,ताहेर बागवान,भगवान शिंदे,यांचे स्वाक्षऱ्या होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात