📰 ताज्या घडामोडी

मंठा शहरात शालांत परीक्षात कॉप्याचा महापूर

Shamsundar chittoda
5 एप्रिल 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

महाराष्ट्र राज्यामध्ये एस.एस.सी. परीक्षेला सुरुवात होऊन मराठीच्या पहिल्या पेपरला मंठा शहरा सारखे काही अपवाद केंद्र वगळता शांततेत सुरुवात झाली. मंठा शहरातील पहिल्या मराठी पेपरच्या कॉपी प्रकरणाची दखल विविध वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांनी घेतलेली आहे.तरीसुद्धा परीक्षा केंद्रावर काहीच फरक पडल्याचे जाणवले नाही.

शेवटच्या पेपरला सुद्धा कॉप्याचा महापूर आल्याचे दिसून आले. पहिल्या पेपरला कॉप्पयाचा सुळसुळाट तर शेवटच्या पेपर पर्यंत कॉप्याचा महापूर बाकीच्या पेपरची काय अवस्था असेल हे सांगायची आवश्यकता नाही. संबंधित विभागाने झोपेचे सोंग घेऊन परीक्षा नावाचा विद्यार्थ्यांशी खेळ खेळवला आहे.परीक्षा नावाच्या या खेळामध्ये असे घडू नाही पण घडलेच तर गुणवंत विद्यार्थी मागे राहून कॉपी बहाद्दराने प्रथम क्रमांक पटकावू नये.असे घडले तर हुशार,गुणवंत विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम होऊन महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारत देशामध्ये कमी गुण पडल्यामुळे ज्या घटना घडतात अशा घटना घडल्या तर याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारणार कोण ? अशा या प्रकरणामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, नुकसान होऊन मानसिकतेवर विपरित परिणाम झाला तर याला जबाबदार कोण ? यावरून परीक्षा केंद्राची मुजोरी कायम लक्षात येत आहे. यात शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा किंवा राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे ?तसेच परीक्षा केंद्राला कॉपी पुरवण्याचा परवाना किंवा ओपन टेक्स्टबुक ची परवानगी तर नाही ना असे शिक्षण विभागाने जाहीर करावे.असे जोरदार चर्चेला उधाण आले आहे.

तरी सदरील प्रकरणाची दखल एस.एस.सी. बोर्ड परीक्षा नियामक मंडळाने व शिक्षण मंत्री महोदयांनी घ्यावी.नस्ता हुशार,गुणवंत विद्यार्थी यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित विभाग जबाबदार राहतील.तरी वरिष्ठांनी सदरील प्रकरणाची वेळीच दखल घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक,मानसिक नुकसान टाळून संबंधितांवर योग्य कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात