📰 ताज्या घडामोडी

जारचे पाणी ; गंदा है पर ठंडा है यह------------------ अशुद्ध पाणी ग्राहकांच्या माथी : पाण्याच्या गोरखधंद्याला आळा घालण्याची गरज---------------------------------------------

Shamsundar chittoda
19 एप्रिल 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा शहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पण ; थंडपाणी विक्रीचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे.यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने पाण्याचे जार विक्रीची गल्लीबोळात दुकानदारी थाटण्यात आली आहे. कमी खर्चात,कमी जागेत चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून आता पाणी विक्रीकडे बघितल्या जात आहे. सुरुवातीला शुद्धीकरणाचे प्लान्ट टाकून मिनरल वॉटरचे जार विकणारे मोजकेच व्यावसायिक होते.परंतु, भूगर्भातील पाणी उपसून केवळ थंड करुन विकण्याला जास्त खर्च लागत नसल्याने आता पाणी विक्रीचा व्यवसाय शहरासह ग्रामीण भागात गल्लोगल्ली पहावयास मिळतो.यात पाण्याच्या शुद्धीबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही.

बोअरवेलद्वारे आलेले पाणी मशिनद्वारे थंड करून जारमध्ये भरले जाते. तो जार सध्या तीस ते चाळीस रुपयात विकल्या जात आहे. नागरिकही दिवसेंदिवस या थंड पाण्याची मागणी करीत असल्याने पाणी विक्री जोरात आहे. विशेषत: विविध कार्यक्रम, सोहळे, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक उत्सवासह शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि दुकानांमध्येही आता जारमधील थंड पाणी वापरले जात असल्याने पाणी विक्रेत्यांची चांदीच आहे.मिनरल वॉटरच्या नावे केवळ अशुद्ध आणि थंड पाणीच पुरविल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन या पाणीव्यवसायाला आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.पाणी विक्रेते घेताहेत नियमांच्या अभावाचा आडोसाकोणताही व्यवसाय सुरु करण्याकरिता विविध विभागांच्या

सोबतच व्यवसायाचा परवानाही लागतो. परंतु पाण्याचे जार विकणाऱ्यांकरिता प्रशासनाची कोणतीही नियमावली नसल्याने पाणी व्यावसायिकांचे फावते आहे. मिनरल वॉटरच्या नावाने जारला केवळ लेबल लावून पाण्याची विक्री होत आहे. याकरिता व्यावसायीक कर तसेच व्यावसायिक महावितरणचे मीटर घेणे बंधनकारक आहे. पण, त्यालाही बगल दिल्याने या संदर्भात कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुसऱ्या,तिसºया दिवशी बदलते पाण्याची चवथंड पाण्याच्या हव्यासापोटी चव नसली तरीही नागरिकांकडून पाण्याची मागणी होत आहे. या पाण्याची दुसºया व तिसऱ्या दिवशी या पाण्याची चव आपोआप बदलत असल्याने या पाण्याची शुद्धी व गुणवत्ता लक्षात येते. या गुणवत्ते संदर्भात जारवर कोणतीही माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे आता जारच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी पाणी वापरणाऱ्यावर आहे. अन्यथा हेच पाणी नागरिकांना दुर्धर आजाराचे गिफ्ट दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पाणी विके्रत्यांच्या भरवशावर आपले आरोग्य सुरक्षित समजणे मोठी चूक ठरू शकते. म्हणून नागरिकांनी आता सजग राहून पाऊल उचलायला हवे.त्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव विचाराधीन आहे. नागरिकांनी गुणवत्तेबाबत जागरुक रहायला हवे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात