📰 ताज्या घडामोडी

आ.विनायक मेटे बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या वर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू-सचिन खरात

Shamsundar chittoda
25 मार्च 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नायक आ. विनायकराव मेटे यांच्याबद्दल सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह असभ्य भाषेत मजकूर टाकून बदनामी केली आहे. यामुळे आ. मेटे समर्थकांची मने दुखावली असुन पोस्ट टाकणाऱ्या बद्दल रोष निर्माण झाला आहे.

बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करु असे शिवसंग्राम तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन दिले आहे.

सोशल मीडिया फेसबुकवर दीपक इंदर थोरात या व्यक्तीने स्वतःच्या अकाउंट वरून आ. विनायकराव मेटे यांच्याबद्दल बदनामी करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह असभ्य भाषेचे पोस्ट टाकली आहे. यामुळे शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. पोस्ट टाकणारा दीपक इंदर थोरात याचा यांच्या निषेध करून ठाणेदारांना निवेदन दिले. मेटे हे अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे. समाजातील लोक त्यांना बहुजन नायक म्हणून मागणी ओळखतात. मात्र दीपक इंदर थोरात या मानसिक रुग्ण व्यक्तीने फेसबुकच्या माध्यमातून स्वतःच्या अकाउंट वरून आ. मेटे यांच्या बाबत आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट टाकली. सदरील पोस्टमुळे तमाम शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच आ.मेटे मानणाऱ्या वर्गामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे दीपक इंदर थोरात या व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. निवेदनावर शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात, भारत राजबिंडे,मनेष वटाणे, गणेश सांगुळे, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते*

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात